आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजघराण्याचा वारसा मागे टाकत चित्रपटांतून मिळाली ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म - २५ ऑगस्ट १९६९
शिक्षण - डून स्कूल, सेंट स्टीफन कॉलेज, नवी दिल्लीमधून पदवी आणि पुण्याच्या एफटीआयआयमधून पदवी.
चर्चेत - त्यांच्या "द सेल्युलाइड मॅन' या माहितीपटाने जगाचे लक्ष आकर्षित केले.
शिवेंद्रसिंह राजस्थानमधील डुंगरपूरच्या तत्कालीन राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांचे आजोबा डुंगरपूरचे तेव्हाचे राजे, तर काका राजसिंह डुंगरपूर क्रिकेट क्षेत्रात कार्यरत होते. पाटण्याजवळील डुमरावचे तत्कालीन राजे त्यांचे आजोबा होते. लहानपणी आपली आजी महाराणी उषादेवी यांच्यासह डुमरावच्या वाड्यात प्रोजेक्टरवर चित्रपट पाहत होते. अनेक सायंकाळी त्यांनी विविध जुने हिंदी सिनेमे पाहिले. आजी बऱ्याचदा त्यांना टॉकीजमध्येही घेऊन जात. संपूर्ण चित्रपटगृह त्यांच्यासाठी बुक होत असे. चित्रपट पाहिल्यानंतर ते प्रोजेक्टर व अन्य सामग्री पाहत. यातून पुढे ते चित्रपट क्षेत्राकडे वळले आणि पुण्याच्या फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूटमध्ये दिग्दर्शन व पटकथा लेखनासाठी प्रवेश घेतला.

आपला शैक्षणिक कल वडिलांना सांगितल्यावर त्यांनी बोलणेच सोडून दिले. शिवेंद्र यांनी वकिली करावी, अशी त्यांची इच्छा होती. आजोबांचे भाऊ हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात वकील होते. वडिलांच्या घराण्यातील सर्व जण ऑक्सफर्ड किंवा केंब्रिजमध्ये शिकले होते. मात्र, शिवेंद्र यांना मुंबईतच शिकावे वाटत होते. १९९६ मध्ये पुण्यातून पदवी प्राप्त केल्यानंतर ते गुलजार यांचे सहायक झाले. डून स्कूलमधील शिक्षणादरम्यान गुलजार यांच्या "माचिस'चा अभिनेता चंद्रचूडसिंह याच्याशी त्यांची मैत्री झाली. चंद्रचूड आणि शिवेंद्र यांनी दिल्लीत सोबत महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

२००१ मध्ये त्यांनी डुंगरपूर फिल्म्स नावाच्या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. सुरुवातीच्या अॅड फिल्मनंतर त्यांनी जवळपास ५०० व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती केली. २०१२ मध्ये "सेल्युलाइड मॅन' हा मोठा माहितीपट तयार केला. भारताच्या प्रसिद्ध फिल्म अर्कायव्हिस्टबाबत हा माहितीपट होता. हे अर्कायव्हिस्ट नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडियाचे संस्थापक संचालक होते. जगभरातील ५० चित्रपट महोत्सवांत माहितीपटाचे प्रदर्शन झाले. यानंतर यांनी जुन्या चित्रपटांना नवी ओळख मिळवून देण्याचे ठरवले आणि गेल्या वर्षी फिल्म हेरिटेज फाउंडेशनची स्थापना केली. ते ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटचे संरक्षक आहेत. अाल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटाला नवे रूप देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जगात चित्रपट नूतनीकरणात काम करणारी एकमेव संस्था फोंडाडिओन सिनेतेका डी बोलोग्नमध्येही कार्यरत आहेत. अमिताभ बच्चन, आमिर खान आणि फरहान अख्तर आदी अभिनेत्यांनी त्यांच्या फाउंडेशनमध्ये सहभागी होणाऱ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.