आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियातील धातुशास्त्रविषयक पुस्तके वाचून पोलाद व्यवसायाचा अभ्यास, संदीप जाजोदिया यांचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या वेळी संदीप कॉलेजात शिकत होते, त्या दिवसांपासून ते वडिलांसह व्यवसायात काम करत असत. वडील ट्रेडिंगचे काम करत होते. मग नंतर संदीपदेखील हेच करू लागले. काही काळानंतर संदीपला वाटले की उत्पादनाचे युनिट सुरू केले पाहिजे. त्या वेळी स्टेनलेस स्टीलचा बाजार खूपच तेजीत होता आणि संधीही त्यात होत्या. मग त्यांनी फेरो अॅलॉय युनिट सुरू केले. यात वडिलांची कोणतीही मदत घेतली नाही.  

तीन बँकांमधून ८० लाख रु. एकत्र केले. तेव्हा बँकांना समजावणे खूपच कठीण होते. त्या काळात त्यांचा विवाह ओपी जिंदल यांची मुलगी म्हणजेच नवीन जिंदल यांची बहीण सीमा हिच्याशी झाला. ओपी जिंदल नेहमीच संदीपला स्टीलचे मोठे युनिट सुरू करण्यासाठी प्रेरित करत असत. पण त्यांचे स्टीलबाबतचे ज्ञान खूपच कमी होते.
 
त्यामुळे ओपी जिंदल त्यावेळीही पोलाद क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक होते, तेव्हा संदीप यांना माहिती कमी असल्याकारणाने त्यांच्यासमोर संकोच होत असे. नवे नवेच लग्न झाले होते, तेव्हा ते स्वत:ला सासऱ्यासमोर मूर्ख सिद्ध करू इच्छित नव्हते. तेव्हा त्यांनी रशियन मेटलर्जिकलची (धातुशास्त्र) पुस्तके वाचणे सुरू केले होते. नियमितपणे यासाठी ते ब्रिटिश काउन्सिलच्या ग्रंथालयात जात असत आणि त्याविषयीचा अभ्यास करत आणि सासऱ्यांबरोबर व्यवसायासंबंधी चर्चा करत.  

अंततः कंपनी तर उभी राहिली, पण तेव्हापर्यंत ती वेळ येऊन ठेपली होती की, फेेरो क्रोम ला कुणीच विचारत नव्हते. संदीपला तर प्रत्येक पावलावर खर्च कमी करावा लागत असे आणि पैसा वाचविण्यासाठी विचार करावा लागे. प्रत्येक पंप आणि मोटरच्या समोर ते आपल्या मजुरांसह उभे राहत आणि काम समजून घेत असत. ते म्हणतात की, जे शाळा-कॉलेजात शिक्षण मिळालेले आहे, त्याहूनही कितीतरी अधिक मी मजुरांसह उभे राहून काम शिकलो.
 
आजही भलेही त्यांच्याकडे कोणतीही पदवी नसेल, पण यंत्रांच्या सुट्या भागांची त्यांना खूप माहिती आहे. मॉनेट पोलाद अँड एनर्जीची सुरुवात अशी झाली. १९९४ मध्ये सुरू झालेली कंपनी सातत्याने संकटात राहिलेली आहे. परंतु खूप संघर्षानंतर २००० मध्ये कंपनीचा तोटा अखेर बंद झाला. 
 
जन्म- १४ मार्च १९६६
वडील- माधोप्रसाद जाजोदिया
शिक्षण- सेंट कोलंबिया स्कूल दिल्ली आणि बी.कॉम (ऑनर्स), युनि.ऑफ दिल्ली.
कुटुंब - पत्नी सीमा, मुलगी निकिता जाजोदिया  
का आहेत चर्चेत - त्यांना अासोचेमचे प्रमुख बनविले गेले आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...