आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SUCCESS STORY: आरोग्यसेवेसाठी वाहिले आयुष्य: डॉ. पूनम खेत्रपाल सिंह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चर्चेत का? जागतिक आरोग्य संघटनेत आग्नेय आशियात विभागीय संचालकपद भूषवणार्‍या त्या पहिल्या महिला. 44 वर्षांनंतर या पदावर विराजमान होणार्‍या दुसर्‍या भारतीय

डॉ. पूनम खेत्रपाल सिंह : जागतिक आरोग्य संघटनेच्या अग्नेय आशियाच्या संचालिका

जन्म : 30 ऑगस्ट 1949, डेहराडून
कुटुंब :(पती) डॉ. ए. दीदार सिंह- सेक्रेटरी जनरल फिक्की, सोनालिनी नावाची 32 वर्षीय मुलगी
शिक्षण : 1969 मध्ये कानपूर विद्यापीठातून पदवी आणि 1971 मध्ये इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण, 1966 मध्ये बर्मिंगहॅम विद्यापीठातून सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर, 2002 मध्ये मुंबईतून लोकसंख्या अभ्यासात पदव्युत्तर, 2004 मध्ये बांग्लादेशातील विद्यापीठातून पीएचडी.

डेहराडूनमध्ये जन्मलेल्या डॉ. पूनम या लहानपणापासून खूप भावुक होत्या. लहान असतानाच त्यांना इतरांच्या वेदना कळायच्या आणि त्या मदतीसाठी सरसावत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी त्या जादा मेहनत घेत असत. अभ्यासात हुशार असल्यामुळे आई-वडिलांनी नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांना आयएएस बनायचे होते. खूप मेहनत घेऊन त्या आयएएस बनल्या. आईशी त्यांचे खूप चांगले नाते होते. त्या प्रत्येक गोष्ट आईला सांगत असत. मागील वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. आपल्या व्यग्र आयुष्यातून वेळ काढून त्या आईच्या प्रकृतीची चौकशी करत असत. प्रत्येक क्षणी त्यांना आईची चिंता सतावत होती. वेळ मिळेल तेव्हा त्या आईला भेटायला जात असत. त्या सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ आहेत. आरोग्य सुर्शूषा क्षेत्रात त्यांना 30 वर्षांचा अनुभव आहे. आयएएस झाल्यामुळे काही वेळ त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा केली. विभागीय संचालकपद मिळण्यापूर्वी त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यात आंतरराष्ट्रीय सल्लागार होत्या. पंजाबमधील आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्यात त्या सचिव आणि संयुक्त सचिवदेखील होत्या. सप्टेंबर 2013 मध्ये आग्नेय आशियात विभागीय संचालक पदावर त्या प्रभारी होत्या. फेब्रुवारी 2014 मध्ये हे पद पूर्णपणे त्यांच्याकडे आले.
डॉ. सिंह म्हणतात, कुटुंबातूनच काम करण्याची शक्ती मिळते. त्यांचे पती नेहमी प्रोत्साहन देतात. पतीचे सहकार्य मिळाले नसते तर कामासोबतच घरातील जबाबदार्‍या एवढय़ा उत्कृष्टपणे पार पाडू शकले नसत्या. इतरांचे आयुष्य घडवण्यासाठी आपण काही करत आहोत, यात त्यांना आनंद आहे. नव्या जबाबदारीत त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागात वाढलेल्या समस्या सोडवण्याचे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेले कर्करोग, हृदयविकारासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम असेल. त्यांचे टीम सदस्य सांगतात, ‘पूनम यांना काम आणि खासगी आयुष्यात समतोल साधता येतो. टीममधील इतर सदस्यांना त्या याविषयी मार्गदर्शनही करतात. इतरांच्या अडचणी त्या समजून घेतात आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी पुढे येतात.