आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. थॉमस मॅथ्यू - परराष्ट्र संबंधांतील तज्ज्ञाने लिहिले पक्ष्यांवरही पुस्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेबी आणि सीसीआय (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) हे दोन मोठे नियामक आहेत. सेबी शेअर बाजारावर आणि सीसीआय दैनंदिन वस्तूंची भाववाढ आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवते. या दोन्ही संस्थांचे प्रमुख अद्याप निवडले जायचे आहेत. या पदासाठी अनेक दावेदार आहेत. मात्र सेबीसाठी प्रमुख नाव आहे. डॉ. थॉमस मॅथ्यू व सीसीआयसाठी हर्षवर्धनसिंह...
वय - ६२
शिक्षण - जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय धोरणावर पदव्युत्तर पदवी, एम.फील. आणि पीएचडी.
चर्चेत : सेबीच्या प्रमुख पदासाठी सध्या ते दावेदार आहेत.
केरळ बॅचच्या या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती प्रारंभी कोचीनमध्ये जिल्हाधिकारी म्हणून झाली होती. यानंतर ते तत्कालीन मंत्री के. करुणाकरण यांचे खासगी सचिव झाले. तेव्हा त्यांनी मंत्र्याच्या बंगल्यासाठी मारुती उद्योगाकडे काही वस्तूंची मागणी केली होती. यात काही वातानुकूलित यंत्रणा आणि फर्निचरचा समावेश होता. शिवाय स्विमिंग पूल आणि दोन मारुती कार यांचीही मागणी त्यांनी केली होती. मारुती उद्योगाचे तत्कालीन प्रमुख रमेश भार्गव यांनी या मागणीची पूर्तता करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मॅथ्यू यांना हे रुचले नाही. या संदर्भांचा उल्लेख मारुती उद्योगाचे माजी अधिकारी जगदीश खट्ट्रर यांनी "ड्रिव्हन : मेमॉयर्स ऑफ ए सिव्हिल सर्व्हंट टर्न्ड एंटरप्रेन्योर' या पुस्तकात केला आहे.

नंतर मॅथ्यू केंद्रात अनेक विभागाचे सचिव राहिले. काही काळानंतर आर्थिक प्रकरणांच्या विभागात भांडवली बाजार विभागाचे सहसचिवही राहिले. पुस्तकांची आवड असणारे मॅथ्यू पक्षिप्रेमीही आहेत.विविध पक्ष्यांच्या प्रजातींवर त्यांनी "विंग्ड वंडर्स ऑफ राष्ट्रपती भवन' हे पहिले पुस्तक लिहिले. म्हणजे त्यांना राष्ट्रपती भवनाचेही आकर्षण होते. यामुळे राष्ट्रपती भवनात अतिरिक्त सचिव राहिलेले मॅथ्यू यांनी यावर अभ्यास सुरू केला. वर्षभर त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या परिसरात येणाऱ्या या पक्ष्यांच्या प्रजातींची छायाचित्रे घेतली. पुस्तकात एकूण १११ प्रजातींचा उल्लेख आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विषयावरील आपल्या पीएचडीचा संदर्भ त्यांनी आपल्या दुसऱ्या पुस्तकात वापरला आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर १९६७ पर्यंत देशात जे विदेशी मान्यवर पाहुणे आले त्यांच्याविषयीची रंजक माहिती त्यांनी एकत्र केली.

यात महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची एक कहाणी आहे. १९६१ ची गोष्ट. नेहरू यांच्या कार्यकाळात त्या भारतात आल्या. या दौऱ्यात शिकारीसाठी त्या जयपूरला गेल्या. त्यांना वाघांची शिकार करावयाची होती आणि यासाठी त्यांना एक बछडा हवा होता. तेव्हा पंतप्रधान नेहरू यांनी राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना पत्र लिहून आग्रह केला होता की, शिकारीच्या छंदासाठी कुणाचा जीव जायला नको.
बातम्या आणखी आहेत...