आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकी नव्हती तेव्हा सुरू केली "ओला' कंपनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेरणादायी | भाविश अग्रवाल, आंत्रप्रेन्युअर

वय- २९ वर्षे
आई-वडील- दोघेही डॉक्टर
शिक्षण- आयआयटी मुंबईतून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये बीटेक
कुटुंब - पत्नी
चर्चेत - रतन टाटा यांनी अनेक कंपन्यांत पैसा गंुतवला आहे, त्यात ‘ओला’चा समावेश.

मायक्रोसॉफ्टमधील नोकरी सोडून डॉक्टर आई-वडिलांना ओला सुरू करण्याबाबत सांगितले तेव्हा मुलाची ट्रॅव्हल कंपनी सुरू करण्याची इच्छा असल्याचे त्यांना वाटले.

२०१५ हे वर्ष या व्यक्तीसाठी अनेक चांगल्या बातम्या घेऊन येणार आहे. वर्षाच्या सुरुवातीस त्यांचे लग्न झाले. कंपनीचे नाव देशातील प्रमुख वृत्तपत्रांत झळकू लागले. टाटा समूहाचे माजी प्रमुख रतन टाटा यांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ओला कॅब सुरू केली होती तेव्हा त्यांच्याकडे स्वत:ची चारचाकीही नव्हती.

२०१० मध्ये त्यांच्या डोक्यात ‘ओला’ची कल्पना सुचली तेव्हा त्यांनी कुटुंबाला याची माहिती दिली. कुटुंबाला वाटले, काय विचित्र माणूस आहे. चांगली नोकरी सोडून याला ट्रॅव्हल एजन्सीसारखे काम करायचे आहे! असे असले तरी त्यांनी आपल्या कुटुंबाची माहिती कुठेही दिलेली नाही.

नोकरी करत असताना ते बंगळुरूहून बांदीपूरला जात होते. यासाठी ते टॅक्सी घेत. रस्त्यात टॅक्सीवाल्याने पैशावरून वाद घातला. टॅक्सीत बसण्यापूर्वी भाडे अाकारणी ठरलेली होती. चालक जास्तीच्या पैशासाठी जोर देऊ लागला. मात्र, भाविश त्यासाठी तयार नव्हते. त्यांनी जास्तीच्या पैशास नकार दिल्यानंतर चालकाने वाटेत उतरवले. त्यांना याचा खूप त्रास झाला. यातून त्यांना विश्वासार्ह टॅक्सी सेवा सुरू करण्याची कल्पना सुचली. यासाठी त्यांनी टॅक्सी बुक करणे आणि त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी अॅप विकसित केले. त्यांनी जेव्हा स्टार्टअप सुरू केली तेव्हा त्यांनी स्वत: लोकांना कॅबमध्ये बसून विमानतळावर सोडले आणि स्वत: फोन रिसीव्हही केला. केवळ सहा महिन्यांच्या कामात त्यांनी जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक सॉफ्ट बँकेचे प्रमुख मासायोशी सन यांचा विश्वास प्राप्त केला.

लुधियानाचे रहिवासी भाविश यांनी करिअरची सुरुवात मायक्रोसॉफ्ट रिसर्चमधून केली होती. त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये काम करताना दोन पेटंटची नोंदणी केली होती. याबरोबर त्यांची तीन संशोधने आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाली. आता त्यांचा दिवस सकाळी सात वाजता सुरू होऊन रात्री एक वाजता संपतो. याच पद्धतीने सलग काम करत त्यांनी पाच वर्षांत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत काही कंपन्यांची खरेदी केली.

ओला केवळ ग्राहकांना इच्छित स्थळी पाेहोचवण्यासाठीच उपयोगी ठरते, असे नव्हे, तर चालकांना टॅक्सी घेण्यासाठीही मदत करत असल्याचे भाविश यांचे म्हणणे आहे.