आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनी मालकाने उमेदवार उतरवून जिंकली निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साबू जॅकब, एमडी, किटेक्स गारमेंट्स
- वय -सुमारे ४५
- आई -एम.सी. जॅकब, भाऊ बबन
- पत्नी-रंजनाजोसेफ
- शिक्षण- केरळविद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर.

चर्चेत-त्यांच्या कंपनीनेकेरळ निवडणुकांत उमेदवार लढवून बहुतांश जागी विजय मिळवला.
डाव्यांचा प्रभाव असलेल्या केरळमध्ये साबूंच्या कंपनीत एकही युनियन बनू शकली नाही.

एखादी कंपनी देशाच्या निवडणुकीत भाग घेऊन आपले उमेदवार निवडून आणण्याची ही शक्यतो देशातील पहिलीच घटना असेल. साबू जॅकब यांनी ते सत्यात उतरवले आहे. साबूंच्या वडिलांनी १९६८ मध्ये केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील किजाक्कबलममध्ये अण्णा अॅल्यूमिनियम नावाने कारखाना सुरू केला होता. तेव्हा त्यात फक्त आठच जण काम करायचे. १९७० च्या दशकात देशातील कपड्यांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांनी किटेक्समध्ये कपड्यांची गिरणी सुरू केली. यात लुंग्या बनवल्या जायच्या.
१९९५ मध्ये त्यांनी लहान बाळांचे कपडे बनवायला सुरुवात केली आणि मुलगा साबूही त्यांना मदत करू लागला. पाहता पाहता बालकांच्या वस्त्रांबाबत साबूंची कंपनी जगातील सर्वात मोठी दुसरी कंपनी बनली. सोबतच ते शालेय बॅग छत्रीही बनवू लागले. नोकरी देण्याच्या बाबतीतही ही कंपनी लवकरच केरळच्या खासगी क्षेत्रात अव्वल बनली. आठ लोकांनी सुरू झालेल्या या कंपनीत आता १५ हजार कर्मचारी आहेत. २०११ मध्ये साबूंच्या वडिलांचे निधन झाले. साबू यांची कंपनी सीएसआरअंतर्गत गावांत काही काम करायची, तर कम्युनिस्ट आणि काँग्रेस नेते त्यात आडकाठी आणायचे. २०१२ मध्ये काँग्रेसच्या अधिपत्याखालील पंचायतीने त्यांच्या कंपनीचा परवाना नूतनीकरणास नकार दिला. कंपनीतून कचऱ्याच्या रूपात घाण पाणी निघत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे होते. न्यायालयाने मात्र कंपनीला क्लीन चिट दिली. केरळमध्ये डाव्यांचा वरचष्मा आहे. मात्र, त्याच केरळमध्ये साबू यांच्या कंपनीत कोणतीच युनियन तग धरत नाही. पंचतारांकित पद्धतीने कारखाना चालवणारे साबू कर्मचाऱ्यांना नि:शुल्क भोजन निवास सेवा देतात. दरम्यान, कंपनीला मदत करण्याचे आवाहन २०१३ मध्ये पंचायतीच्या प्रमुखांनी केले. त्यातील पराभवानंतर २०१३ मध्येच ट्वेंटी-२० चॅरिटेबल सोसायटीज अॅक्ट नामक संस्था सुरू केली आणि गावात शौचालय, पाणी, नि:शुल्क रुग्णवाहिका आणि अन्य मूलभूत सुविधा देऊ केल्या. सोबतच, मागासवर्गीय आणि गरिबांना लग्नकार्यात आर्थिक मदतही दिली. अडीच वर्षांत गावासाठी ३२ कोटी रुपये खर्च केले. याच पार्श्वभूमीवर साबू यांनी गावच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले. गावांतील १९ वॉर्डांत एक हजारहून अधिक मतदार आहेत. त्यातील १७ वॉर्डांत साबू यांच्या उमेदवारांनी आणि उर्वरित दोनमध्ये मुस्लिम संघटनेने विजय मिळवला. उमेदवार निवडीसाठी त्यांनी किमान पदवीधरची अट ठेवली होती.