आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Story Of Vijayshekhar Sharma Owener Of Paytm

आयपीओ न घेऊ शकल्याच्या शल्यातून दिला पेटीएमला जन्म

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाव- विजयशेखर शर्मा, जन्म- ८ जुलै १९७३
शिक्षण- दिल्ली टेक्नॉलॉजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
कुटुंब- वडील शाळेत शिक्षक आणि आई गृहिणी. एक बहीण विवाहित आहे.

विजयने महाविद्यालयीन जीवनात मित्रासोबत इंटरनेटवर आधारित व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायात त्यांनी शिखर गाठले. नंतर अमेरिकी कंपनी लोट्स इंटरवर्क्सला त्यांनी याची विक्री केली. १९९९ मध्ये ते एक्सएस कॉर्पोरेशनशी जोडले गेले. विजय यांनी आपण लहान गावातून आल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. अशात दिल्लीत उच्च शिक्षण घेण्याचा विचार एक अाव्हान होते. मात्र, आपण काहीच करत नसल्याबद्दल आई-वडिलांची बोलणी खात राहावे,अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी दिल्लीत प्रवेश घेतला. ते म्हणाले, सुरुवातीला इंग्रजी बोलण्यात अडचणी आल्या. त्यानंतर इंग्रजीत विचार करणे सुरू केले. कॉलेज संपल्यानंतर ते अमेरिकेत गेले. इथेच त्यांनी भारतात काहीतरी नवे करण्याचा निश्चय केला. त्यंानी आपला दृढनिश्चय कुटुंबीयांना सांगितला तेव्हा आईला रडू कोसळले. वडील व बहिणीने खूप विरोध केला. मात्र, ते आपल्या निर्णयावर ठाम होते.

२००० मध्ये भारतात येऊन त्यांनी वान ९७ कम्युनिकेशन्सची स्थापना केली. ही कंपनी मोबाइलशी संबंधित व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस देत आहे. २०१० मध्ये आयपीओ (पब्लिक इश्यू) घेण्याचा विचार आला, मात्र त्यात यश आले नाही. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, न घेता आलेला आयपीओ सर्वात मोठे अपयश होते. यातून बाहेर पडण्यासाठी पेटीएम लाँच करण्यात आले. हे इन्स्टंट मोबाइल रिचार्ज अॅप होते. इथे युजर्सना आकर्षक ऑफर्सही मिळतात. आता जुन्या गोष्टींचे दु:ख वाटत नाही.