Home »Divya Marathi Special» Success To Make Water From Air

हवेपासून पाणी तयार करण्यात यश

दिव्‍य मराठी | Apr 20, 2017, 06:45 AM IST

  • हवेपासून पाणी तयार करण्यात यश
मेसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने ‘मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क’ (एमओएफ)मटेरियलद्वारे हवेपासून पाणी तयार करू शकणारे तंत्र विकसित केले आहे. सायन्स जर्नलमधील वृत्तानुसार, या यंत्रासाठी लागणारी बॅटरी सौरऊर्जेवर चार्ज होते. हवेपासून पाणी तयार करण्यासाठी २० टक्के आर्द्रतेची गरज असते. कमी पावसाच्या ठिकाणी असे हवामान असते. हवेपासून पाणी तयार करण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर अनेक दिवसांपासून होते. आता त्यात यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
{ वातावरणात २० ते ३० टक्के आर्द्रता असल्यास १२ तासांत एक किलो एमओएफपासून २.८ लिटर पाणी तयार केले जाऊ शकते.
{ एमओएफचा शोध २० वर्षांपूर्वी लागला होता. त्यानंतर जगभरात २० हजार एमओएफ तयार करण्यात आले. सर्वांचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. मात्र एमआयटीच्या शास्त्रज्ञांचे एमओएफ पूर्णपणे वेगळे अाहे. }phys.org

Next Article

Recommended