आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिप्लाच्या वारसानेच सोडली घरची कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी सिप्लाचे संस्थापक वाय. के. हामिद यांनी आपला भाचा कामिल आणि त्यांची बहीण समीना वजिराल्ली यांना आपला उत्तराधिकारी बनवण्याचा उल्लेख केला होता. हे दोघेच कंपनीचे भविष्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. कंपनीच्या परंपरेनुसार हे दोघे आता सिप्लाचा कारभार सांभाळतील. मात्र, कामिल सिप्लातून बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला. पाच वर्षांपूर्वी पावसाळ्यात त्यांना कंपनीत सहभागी करून घेण्यासाठी समभागधारकांकडून परवानगी मागण्यात आली होती.

सिप्ला जुनी कंपनी आहे. १९४५ मध्ये स्थापन या कंपनीत जाऊन स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेत्यांनी देशवासीयांसाठी औषध निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले होते. १९७० मध्ये सिप्लाच्या नेतृत्वाखाली भारतीय आैषध कंपन्यांना पेटेंटेड प्रॉडक्ट बनवण्याची परवानगी मिळू शकली. यानंतरही अनेक कंपन्या भारतात स्वस्तात औषधे बनवू लागल्या. १० हजार कोटी रुपये उलाढाल असणार्‍या या कंपनीमध्ये वाय. के. हामिद यांच्याकडे १५.५ टक्के शेअर आहेत. प्रमोटर्सकडे ३७ टक्के शेअर्स आहेत. कामिल वाय.के. यांचे भाऊ एम.के. हामिद यांचे पुत्र आहेत.

पाच वर्षांपूर्वी कामिल कंपनीमध्ये मार्केटिंगचे काम पाहू लागले आणि यात ते यशस्वीही ठरले. यासोबत संशोधन व विकास पथकासोबत एकत्र बसून धोरण ठरवणे हे त्यांचे काम होते. कंपनीची निर्यात त्यांनीच वाढवली. सिप्लासाठी विदेशी भागीदारांची भेट घेण्याची जबाबदारी त्यांचीच होती. ते आल्यानंतर सिप्लाची जबाबदारी कोणाकडे असेल याची चर्चा बंद झाली.

अनेक बिझनेस घराण्यांप्रमाणे कंपनीमध्ये सुभानू सक्सेना नवीन सीईओ आणण्यात आले. त्यांचे वेतन खूप जास्त होते. सिप्लाचे १ टक्क्यापेक्षा काहीसे जास्त शेअर ठेवणारे कामिल यानंतर नवा पर्याय शोधत होते.

- कामिल हामिद, चीफ स्ट्रॅटेजिस्ट
- जन्म- १९८२
- वडील- मुस्तफा हामिद
- शिक्षण- सिंगापूरच्या युनायटेड वर्ल्ड कॉलेजमधून पदवी आणि न्यूयॉर्कमध्ये बीए
चर्चेत- नुकतीच त्यांनी कुटुंबाची कंपनी सिप्ला सोडली.
बातम्या आणखी आहेत...