आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानात नोकरी ते स्वर्णमॉलचे मालक, स्वर्णतीर्थ ते अहिंसातीर्थ...रतनलाल सी. बाफनांचा सुवर्णप्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रतनलाल सी. बाफना यांचे सामाजिक कार्य, सूवर्ण व्यवसायातील स्वर्णतीर्थ ते अहिंसातीर्थ हा 'सुवर्णप्रवास' थक्क करणारा आहे. सोने-चांदीच्या व्यवसायात रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स हा बॅन्ड विकसीत करणार्‍या रतनलाल सी बाफना यांनी व्यवसायाप्रमाणेच त्यांच्या आयुष्याचे पैलू देखील सोन्या-चांदीसारखे चकाकते ठेवले आहेत.

रतनलाल बाफना यांचा जन्म राजस्थानमधील भोपालगड येथे झाला. 10 पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते निव्वळ योगायोगाने सूवर्णनगरी म्हणजेच जळगावात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्स येथे नोकरी सुरू केली. अल्पावधीत त्यांनी व्यवसायातील कसब हस्तगत केले. तसेच विश्‍वासदेखील संपादन केला. तब्बल 19 वर्षे एकाच ठिकाणी काम केल्यानंतर बाफनांमध्ये लपलेला उद्योजक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणूनच त्यांनी 1974 मध्ये  नोकरीला रामराम ठोकून स्वत:च्या नावाने म्हणजेच आर. सी. बाफना ज्वेलर्सची महुर्तमेढ रोवली. नवे स्वप्न, नव्या विचारांना सोबत घेऊन बाफनांनी जळगाव येथील सुभाष चौकात सोने व चांदीचे शोरूम 'नयनतारा' सुरु केले. 1974 मध्ये लावलेले हे छोटेसे रोपटे आज वटवृक्षात रुपांतरित झाले आहे.

जगात एखाद्या गोष्टीची भव्यता काय असू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आरसी बाफनांचा स्वर्णमॉल...!

> हेही वाचा...सायकलवरून घरोघरी दूध ते ऑनलाईन विक्रीपर्यंत, चितळे उद्योगाचा संघर्ष आणि यशाचा प्रवास

> हेही वाचा... 'फर्ग्युसन'ची नोकरी सोडून सुरू केली शिक्षणसंस्था, वाचा सिम्बायोसिसच्या डॉ. मुजूमदारांची यशोगाथा

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...