आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माइकला म्हणतात अचानक झालेला अब्जाधीश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माइक केनन ब्रोकिस.ऑस्ट्रेलियन बिझनेस सॉफ्टवेअर कंपनी अटलॅसियनचे ते  सहसंस्थापक  आहेत. आपला कॉलेजचा मित्र स्कॉट फारक्वारबरोबर त्यांनी ही कंपनी स्थापन केली.  दोघेही कंपनीचे साईओ आहेत.  सिडनीस्थित ही कंपनी २०१५ मध्ये नॅसडॅकमध्ये सामील झाली.   याच्या शेअर्सला चढा भाव मिळाल्याने एकाच रात्रीत त्यांची संपत्ती दुप्पट झाली.  दोघांकडै प्रत्येकी ३७ टक्के शेअर्स आहेत. कंपनी गेल्या दहा वर्षांपासून फायद्यात आहे तेही विक्रीसाठी वेगळा स्टाफ नसताना.   याशिवाय यांच्या कस्टमर्सची संख्या ५१ हजारापेक्षा जादा आहे.  यात सिटीग्रुप, ईबे, नासा आणि  टेस्ला या नावांचा समावेश आहे. या कंपन्या आज यांच्या सॉफ्टवेअर्सचा वापर करतात.  ही कंपनी १५ पेक्षा जास्त सॉफ्टवेअर विकते. गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियातील सर्वात उत्तम कंपनी म्हणून ही ओळखली जाते.
  
माइकचा जन्म १९७९ मध्ये झाला. त्याचे वडील बँकेत  कार्यकारी अधिकारी होते. सिडनीच्या क्रानब्रुक स्कूलमध्ये त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्याअगोदर ते अमेरिका, तैवान, हाँगकाँग आणि इंग्लंडमध्ये राहिले. माइकला अचानक झालेला अब्जाधीश म्हटले जाते.  कारण स्कॉट आणि माइक यांनी केवळ हा विचार करून कंपनी सुरू केली की, नोकरी करण्यापेक्षा हे आधिक चांगले.  वयाच्या २२व्या वर्षी सिडनीमध्ये एका दुकानाच्या वर असलेल्या अपार्टमेंटमध्ये दोघांनी काम सुरू केले होते.  स्कॉटही  काम करणाऱ्या कुटुंबातील परिवारांपैकी आहे.  ते जेव्हा ११ वर्षाचे होते तेव्हा त्यांना काॅम्प्युटर हवा होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत त्यांना कॉम्प्युटर हवाच होता. कारण माझ्या सर्व मित्रांकडे तो होता आणि त्यावर गेम खेळला जाऊ शकतो हे मला माहित होते . शेवटी पालकांना ब्लॅकमेल करून मी तो कॉम्प्युटर घेतलाच.
नंतर वडिलांनी बाद झालेला कॉम्प्युटर दिला.  नंतर युनिव्हर्सिटी ऑफ साउथ वेल्समधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन्ही सॉफटवेअर इंजिनियर्सनी ही कंपनी २००२ मध्ये सुरू केली होती.  आज वयाच्या  ३७ व्या वर्षी  माइक कोट्यवधी रुपयांच्या घरात राहतो.  त्यांच्याजवळ स्वत:चे पामबीच आहे. ते टेस्ला कंपनीची एक लाख वीस हजार डॉलर्सच्ी  इलेक्ट्रिक मोटार चालवितात. देशात जे लोक महागडी  टेस्ला पावरवाल बॅटरी सिस्टिम  वापरतात, अशा  निवडक लोकांमध्ये त्यांचा समावेश आहे.  ते म्हणतात की, बरेच वर्षापूवी अॅपलचे संस्थापक  स्टीव जॉब्सबाबत वाचले होते की कपडयांच्या बाबतीत त्यांना काय पसंत आहे? जीवन दगदगीचे होत जाते.  आज काय पोशाख घालायचा हा विचार करायलाही मला वेळ नाही.  याशिवाय मला काळजी करायलाही वेळ नाही.  १.६७ अब्ज डॉलर संपत्तीचे मालक माईक म्हणतात की, कोणी मला अब्जाधीश म्हणले तर मला चांगले वाटत नाही. 

श्रीमंतांच्या यादीत येणे ही बाब सेलिब्रेट करण्यासारखी नाही.  तो जो पदावर पोहोचतो,तो त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने पोहोचतो.  तुम्ही केवळ यशच संपादत नाही तर अनेक लोक तुमच्याबरोबर जोडले जातात.  ही एक मोठी देणगीच आहे.  मला गर्व वाटावा अशा गोष्टीमध्ये पैशाचा समावेश नाही.  माइक आणि त्यांचा पार्टनर स्कॉट  गेली १६ वर्षापासून एकत्र आहेत. ही कंपनी स्कॉटशिवाय बनू शकली असती काय, असे विचारले असता, माइकची पत्नी म्हणते की,नाही. 
बातम्या आणखी आहेत...