आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आस्तिकता व नास्तिकता म्हणजे काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अत्यंत साधा वाटणारा प्रश्नच मनुष्याच्या वैचारिक जगाचा मूलभूत आधार ठरला आहे. दार्शनिक चिंतनाच्या इतिहासात चेतनेपासून भौतिक जगाची व्युत्पत्ती मानणार्‍या समजुतीला भाववादी-अध्यात्मवादी म्हटले जाते आणि पदार्थापासून चेतनेचा प्रारंभ मानणार्‍या विचारप्रवाहास भौतिकवादी-विज्ञानवादी म्हटले जाते. या दोन भिन्न दृष्टिकोनांस लोक प्रचलित भाषेत आस्तिक आणि नास्तिक म्हणतात. भिन्न पातळीवरील विचार दोन वेगवेगळ्या जगातील दृष्टिकोन, जीवनदर्शन आणि मूल्यबोध निर्माण करतात. याच्या प्रकाशात व्यक्ती त्यांच्या दैनंदिन समस्यांपासून ते आयुष्यातील मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.

सर्वसामान्य ज्ञान असणार्‍या व्यक्तीपासून तत्त्ववेत्ते, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, धर्माचार्यांकडून आस्तिकतेचा अर्थ "ईश्वर'सारख्या शक्तिमानाचा आस्थापूर्वक घेतला जातो. ईश्वरच आमचा जीवनकर्ता, धर्ता, हर्ता, नियंता आणि सर्वश्रेष्ठ आहे. त्याचा साक्षात्कार होणेच मानवी जीवनातली मोठी फलश्रुती आहे. पाणिनीच्या मते "आस्तिक' शब्दाचा अर्थ लोकोत्तर सत्तेवर विश्वास आहे. अर्थात, ज्याचा पुनर्जन्मावर आणि आत्म्यावर विश्वास आहे, तो आस्तिक आणि ज्याचा
नाही तो नास्तिक ठरतो, तरी याला विविध प्रकारे ओळखले जाते.

भारतीय चिंतन परंपरेनुसार आस्तिकतेला वेगळा आणि सखोल असा अर्थ प्रदान केला गेला आहे. याचा संबंध आस्तिकतेशी किंवा नास्तिकतेशी नाही. आस्तिकतेमुळे वेदावर श्रद्धा ठेवणार्‍या तात्त्विक विचारांचा अर्थबोध होतो. आस्तिकता वेदप्रणीत आहे, अर्थात ज्यांचा तात्त्विक किंवा तत्त्ववादी मार्गावर विश्वास आहे, श्रुती-स्मृतींना प्रमाण मानतात, ते आस्तिक आहेत. ज्याची धर्मग्रंथांवर, श्रुती-स्मृती, मंत्र-संहिता, उपनिषदांवर परमश्रद्धा आणि वेदाच्या दिव्यतेवर आस्था आहे, अशांना संस्कृत साहित्यात आस्तिक म्हटले जाते. या भूमिकेचे विचार मनुस्मृतीच्या "नास्तिक वेदनिंदक' या ग्रंथात मिळते. ज्यांचा वेदावर विश्वास नाही, वैदिक सिद्धांतावर तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची निंदा करतात ते नास्तिक आहेत. मनूच्या मते, वेदाला विरोध करणे अथवा स्वतंत्र चिंतन करणे सारखेच आहे.

वैशेषिक दर्शनाच्या प्रशस्तपाद अविद्येला चार स्वरूपात वर्गीकृत केले आहे. यात शाक्य-लाेकायत इत्यादींनी मांडलेले विचार जे त्रयीच्या (ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद) विरोधात आहेत, त्यांना नास्तिक म्हटले जाते. वेदांचे गाढे अभ्यासक मधुसूदन सरस्वती यांनी वेगवेगळ्या शाखांचे वर्गीकरण देताना बौद्ध, जैन आणि चार्वाकांना या वर्गात ते समाविष्ट करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने ते वेदबाह्य म्हणजे वेदाच्या बाहेरील आहेत. टीकाकार मेधातिथि व कुलुक भट्ट यांनी शास्त्राची अवज्ञा करणार्‍यांना नास्तिक म्हटले आहे.

वास्तविक, भारतीय तत्त्वात "वेद' तात्त्विक विचारांच्या मूळग्रंथाच्या रूपात आधारभूत मानले गेले आहेत. वेदांच्या सनातनी विचारांवर विश्वास ठेवणार्‍यांना आदरणीय तसेच मौलिक तत्त्वज्ञ मानले जाते. या विचारांनी ओतप्रोत असलेला चिंतक वैदिक साहित्यात उपलब्ध असलेल्या चिंतनदृष्टीला भारतीय तत्त्वाची मूल्यवान विलक्षणता, त्याची सांस्कृतिक विशिष्टता आणि वैश्विक विचारकोशात त्याच्या एकूण आचारशास्त्राची धुरा म्हणून त्याकडे पाहत आले आहेत. त्यांच्या दृष्टीने तत्त्वशास्त्राचे सार उपनिषदांत सांगितलेली वेदांची व्याख्याच आहे. याचे जिवंत उदाहरण भारतीय तत्त्वप्रणालीचे व्यापक स्वरूपातील वर्गीकरण आहे.

वेदांच्या प्रति असलेल्या श्रद्धेवरून तत्त्वचिंतकांच्या संप्रदायांस आस्तिक आणि नास्तिक अशा दोन वर्गांत विभाजित केले आहे. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदांत ही षडतत्त्वे आस्तिक आणि चार्वाक, जैन आणि बौद्ध नास्तिकाच्या श्रेणीत ठेवण्यात आलेले आहेत. यातही आस्तिक तत्त्वचिंतकांत सांख्ययोग, न्याय-वैशेषिक तर्कप्रिय यथार्थवादी प्रवाह आहेत. परंतु "शब्द प्रमाण'ला ज्ञानप्राप्तीचा स्रोत मानल्याने आस्तिक श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. चिकित्सक वैदिक ग्रंथावर आधारित कर्मकांडी आणि वेदांताचे अभ्यासक चिंतनाचे प्रवक्ते आहेत. अशा प्रकारे नास्तिकसुद्धा भौतिकवादी तसेच गैर भौतिकवादी तत्त्वाचे पोषक राहिले आहेत.

परंतु चिंतकाकडून आस्तिकतेच्या व्याख्येच्या प्रचलित अर्थानुसार वेगळे करण्याच्या दृष्टीचा सारांश त्यांच्याकडून निरीश्वरवादाच्या तत्त्वाचा पुरस्कार करणे नव्हे. कारण आस्तिकतेचा आधार "वेद' ज्या सत आणि जीवनदर्शनाचा व्युत्पत्ती गं्रथ आहे, त्याच्या केंद्रस्थानी ईश्वराचीच संकल्पना आहे. वेदाची निंदा किंवा प्रतिकारास अक्षम अपराध मानण्याचे कारण वेदाच्या "अपौरुषेयते'ची धारणा आहे. अर्थात, वेद मनुष्याची रचना नाही. ती ईश्वराची कृती आहे. त्याला ऋषिमुनींनी श्रुती-स्मृतीसारख्या गूढ विद्येद्वारे सामान्यांपर्यंत पोहोचवले. वेदाचे प्रामाण्य आणि ईश्वराच्या सत्तेचे सत्यत्व परस्परावलंबी वस्तुस्थिती आहे.

वास्तविक, भौतिकवादी चार्वाक तत्त्वांना सोडून सर्व तत्त्वचिंतक पंथ आपल्या मौलिक दृष्टीने गैर भौतिकवादी तत्त्वांना बळकटी देत आहेत. आपल्या तमाम सिद्धांतवादी प्रस्थापनांमध्ये पदार्थाच्या सत्तेला मानूनसुद्धा त्यांच्या गैरद्वंद्वात्मक आणि अनैतिहासिक दृष्टीमुळे सामाजिक जीवनात चैतन्यवादी तत्त्वांना सुरक्षित करते.

नास्तिकांच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलेली यथार्थवादी जैन आणि बौद्ध तत्त्वेसुद्धा यातून सुटली नाहीत, परंतु नास्तिक म्हणवल्या जाणार्‍या जैन आणि बौद्ध तत्त्वांनी वैदिक चिंतनास मोठे आव्हान देण्याची अंधुक आशा असूनसुद्धा त्यांना तिरस्कृत का व्हावे लागले? श्रमण संस्कृतीचे वाहक असलेल्या बौद्ध आणि जैन परंपरा वैदिक तत्त्वज्ञांच्या प्रहारापासून का वाचू शकल्या नाहीत? इतकी बेपर्वा वृत्ती असूनही आस्तिकतेच्या अर्थाला अशा प्रकारे नव्याने बनवून विशिष्ट अर्थ प्रदान करण्याची कारणे कोणती? या प्रश्नांची उत्तरे केवळ सामाजिक व्यवस्थेच्या त्या इतिहासातूनच मिळू शकतील.
विचाराचे विभाजन "व्यक्ती'च्या ऐवजी "सत्ते'ची आवश्यकता असे राहिले. आपल्या सामाजिक मानसशास्त्राच्या दृष्टीने आस्तिकतेप्रति स्वीकारबोध आणि नास्तिकता म्हणजे नकारभावाच्या कारणांची मुळे बौद्धिक चर्चेत अथवा सिद्धांतवादी संवादात पाहू नयेत. याची पडताळणी परस्परविरोधी हितसंबंध असणार्‍या विभाजित तसेच खंडित सामाजिक वास्तवाच्या सत्तासंघर्षात करायला हवी. यामुळे आजही सामाजिक क्षेत्रात आस्तिकता आदरणीय आणि नास्तिकता द्वेषमूलक, त्याज्य, निंदनीय आणि कटू मानली जाते.

प्रा. सुधा चौधरी
विभागप्रमुख- तत्त्वज्ञान, मोहनलाल सुखडिया विद्यापीठ, उदयपूर.
बातम्या आणखी आहेत...