आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकांना पाहिले, पहिल्यांदा बोलले अन‌् मोठी ताई झाले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिसर्‍यांदा देवदासींना भेटण्यापूर्वी मी स्वत:ला पारंपरिक भारतीय स्त्रीच्या वेशात तयार केले. केसांना पाठीमागील बाजूस बांधले, फुलांचा हार घातला. २०० रुपयांची साधारण साडी, मंगळसूत्र व बांगड्या, टिकली लावली आणि सोबत काकांना नेले. देवदासींनी काकांना पाहिले आणि नमस्कार केला. काकांनी त्यांना सांगितले, ही माझी मुलगी आहे. मी तिला येथील कठीण जीवनाविषयीची कल्पना दिली असून मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी आपण देवदासी स्वत:च्या तब्येतीला नुकसान पोहोचवत आहात. काय मी बरोबर सांगतो आहे ना. सर्वांनी हो असे उत्तर दिले. शिक्षक असल्याच्या कारणामुळे आपल्या मुलांना शिक्षणासोबत नोकरी शोधण्यात मदत करतील.

काकांनी पुढे सांगितले- काही शिष्यवृत्तीविषयीही सांगा की ज्यातून आर्थिकदृष्ट्या मदत मिळेल. जर आपण हे सर्व ऐकू इच्छित नसाल तर काही हरकत नाही. आम्ही दुसर्‍या गावाला निघून जाऊ. मी काकांना पुढे घेऊन गेली आणि सांगितले की आपण त्यांना एड‌्सविषयी का सांगत नाही? हे सांगण्यामागे काय फायदा आहे. काकांनी उत्तर दिले, नकारात्मकतेने कुठलीही सुरुवात केली तर कुणीच ऐकत नाही. हे काकांनी सांगताच देवदासी माझे म्हणणे ऐकण्यास तयार झाले. पहिल्यांदा त्यांनी मला अक्का (कन्नडमध्ये मोठी बहिणीला म्हणतात) म्हटले. गप्पागोष्टी सुरू झाल्या. मी त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप घेण्याविषयी मदत केली. यात देवदासींशी संबंध बनवण्यात तीन वर्षे लागली.

एवढ्या मोठ्या कालावधीनंतर मला त्या स्वत:वर झालेल्या अन्यायाविषयी सांगू लागल्या. प्रत्येक देवदासीची अंगाला शहारे येतील, अशी कहाणी होती. परंतु शेवट एकच होता- समाज. समाजच त्यांना या घाणीतून बाहेर निघू देत नव्हता. मी या देवदासींसाठी एक संस्था बनवली. लोक जुळत गेले. दिल्लीतून अभयकुमार पुढे आले. मी अभयला सांगितले की देवदासींच्या सोबत आठ महिने काम केल्यानंतर पूर्णवेळ प्रोजेक्टमध्ये सहभागी करू. ते आठ महिन्यांनंतर परतले आणि त्यांनी याच कामात कार्यरत राहील, असे सांगितले. मी खूप समजावल्यानंतरही त्याने काहीही ऐकले नाही. मी स्टायपेंड म्हणून काही पैसे देऊ केले. परंतु त्याने ते घेण्यास नकार दिला आणि सांगितले की, फक्त राहायला जागा, दोन वेळचे जेवण आणि स्कूटरसाठी पेट्रोल हवे. अभयचा आत्मविश्वास पाहून त्याला प्रोजेक्ट लीडर बनवून टाकले. देवदासींच्या मुलांसाठी शाळा आणि काहींचा प्राेफेशनल कोर्ससाठी प्रवेश घेतला. एड‌्स जनजागृती कार्यक्रम घेतले. स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून सर्व आजारांविषयी सांगितले गेले, परंतु अभय आणि माझ्यासाठी जगणे सोपे नव्हते.

धमकावण्याचे प्रकार वाढले. आधी अभयसाठी पोलिस प्राेटेक्शन घेतले. परंतु माझी सुरक्षा देवदासी करतील, असे सांगून त्याने पोलिस संरक्षण घेण्यास नकार दिला. आता वाईट परिस्थिती असली तरीही देवदासींनी चांगले विचार रुजवले. त्या मात्र या कामाविषयी नापसंती व्यक्त करीत होत्या. त्यांनी गाय, बकरी, म्हैस पाळणे सुरू केले होते. आम्ही त्यांच्यासाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. १२ वर्षांनंतर काही महिला माझ्याजवळ आल्या आणि बँक उघडण्याचे सांगितले. एकट्याने करणे हे अवघड आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांना बँकेविषयी योग्य माहिती नव्हती. अभय आणि मी त्यांना बँकेची प्राथमिक माहिती दिली. काही व्यावसायिकांची मदत घेऊन बँक उघडण्यात आली. त्यांनी कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाहीसाठी मदत केली. या बँकेचे कर्मचारी आणि शेअर होल्डर देवदासीच होत्या. त्यांना या बँकेत कमी व्याजदरावर कर्ज मिळू लागले. तीन वर्षांत ८० लाख रुपये डिपॉझिट जमा झाले.

सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत तीन हजार महिला देवदासीच्या कचाट्यातून बाहेर पडल्या होत्या. त्यांनी वर्धापनदिनाचे निमंत्रण पाठवले होते. चिठ्ठी वाचून स्वत:वर विश्वास बसत नव्हता. आता त्या माझ्या प्रवासाचा खर्च उचलण्यासही तयार होत्या. मी स्वखर्चाने कार्यक्रमाला जाण्याचे नियोजन केले. कार्यक्रमात कुणी नेता, पुष्पगुच्छ, फुलहार अथवा भाषण नव्हते. त्या वेळी काही महिलांनी आपले जीवनचरित्र मांडले. त्यांनी मला बोलण्यास सांगितले. तसे मी खूप बोलते पण त्या दिवशी मात्र शब्दच सुचले नाहीत. पहिल्यांदा मला परमेश्वराची भेट झाल्यासारखे वाटले. मी परमेश्वराला सांगितले- आपण मला खूप काही दिले. यातून काहीतरी आपणास परत करू शकली. ही मुले आपली फुले आहेत. त्यांना मी परत करीत आहे. अभय तिथेच होता. मी संस्कृतचा एक श्लोक ऐकवला- ‘ना बंगला पाहिजे, ना माेठे पद। ना मला पुनर्जन्म घ्यायचा, ना मरून मला स्वर्गात जायचे । काही द्यायचेच असेल तर काेमल हृदय आिण मजबूत हात दे, ज्याने मला दुसर्‍यांचे अश्रू पुसता येतील। हे सांगून मी माझ्या खुर्चीवर बसले. एका देवसासीने मला भेटवस्तू दिली. ती माझ्या जीवनातील सर्वात भावनात्मक भेटवस्तू ठरली.