आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suketu Mehta Artical On Mystry Behind Indian In America

अमेरिकेत राहणा-या भारतीयांच्या यशामागील रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठरावीक वेळेच्या अंतराने भारतीय वंशाच्या प्रत्येक अमेरिकन नागरिकाला त्याच्या इनबॉक्समध्ये अनेक रंगांच्या फाँटचा एक ई-मेल प्राप्त होत असतो, ‘भारतीय असण्याचा अभिमान बाळगा’. अमेरिकेतील 30 टक्के डॉक्टर भारतीय आहेत. नासामध्ये 36 टक्के कर्मचारी भारतीय आहेत. मायक्रोसॉफ्टमधील 34 टक्के कर्मचारी भारतीय आहेत. भारताने अंकशास्त्राचा शोध लावला आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरसाठी सर्वाधिक उपयुक्त भाषा संस्कृत आहे.
आता माझ्या टेबलावर अशाच ई-मेल्सची पुस्तकी आवृत्ती ठेवलेली आहे. हे पुस्तक आहे एमी चुआ आणि जेड रुबेनफेल्डचे ‘द ट्रिपल पॅकेज : हाऊ थ्री ट्रेट्स एक्सप्लेन द राइज अँड फॉल ऑफ कल्चरल ग्रुप इन अमेरिका’, संकटकाळी चिनी मुलांच्या पालनपोषणावर एमी चुआचे पुस्तक ‘टायगर मॉम’ची अमेरिकेत एक लाट आली आहे. आपल्या पतीसोबत लिहिलेले एमीचे नवे पुस्तक सांगते की, फक्त आशियाई नाहीत, तर सात इतर समूह क्युबन, ज्यू, भारतीय, नायजेरियन, मोरमोन्स, इराणी आणि लेबनॉनचे लोक अमेरिकेत यशस्वी होण्याची कारणे काय आहेत?
पुस्तकाचा दावा आहे की, या समूहांनी तीन वैशिष्ट्यांमुळे प्रगती केली आहे. श्रेष्ठतेची भावना, असुरक्षा आणि उत्तेजनेवर नियंत्रण. ही तीन वैशिष्ट्ये आफ्रिकन अमेरिकन, अपालाचियन्स, वेस्प आणि इतर लोकांमध्ये आढळत नाहीत. अमेरिकेत अशा प्रकारच्या विचारांमुळे कोणावर आघात होतो का? नसेल होत तर त्याचे कारण हे आहे की, गेल्या दशकभरातून अमेरिकनांच्या मानसिकतेत वंश, जात आणि सांस्कृतिक भेदांसंबंधी नवे विचार आले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून आफ्रिकन अमेरिकन किंवा हिस्पॅनिक संस्कृतीच्या संदर्भात काहीही बोलणे सामान्य गोष्ट झाली आहे. वेगवेगळ्या आदर्श अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाबद्दल सहजतेने बोलण्यात येते. याला मी नव्या प्रकारचा वंशवाद मानतो.
ट्रिपल पॅकेजसारखे पुस्तक वंशवादाच्या भाषेत बोलत नाही, मात्र वंश, जातकेंद्रित विचारसरणी चलनात आणण्यासाठीचे एक उदाहरण समजतो. गेल्या शंभर वर्षांत कोणत्याही अमेरिकन समूहावर एखाद्या समूहाच्या श्रेष्ठत्वासंबंधी प्रकाशित होणा-या पुस्तकांचा हा पुढचा टप्पा आहे. लेखकांचा दावा आहे की, पुस्तकांचा वंश किंवा आयक्यूशी काही संबंध नाही. हे जातीयतेसंबंधी आहे. सर्व कृष्णवर्णीय मागे नाहीत. नायजेरिया आणि लायबेरियाच्या लोकांकडे पाहा. ते अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहेत.
चुआ आणि रुबेनफेल्डने भारतीयांबद्दल लिहिले आहे की, देशातील हा सर्वात यशस्वी जातीय समूह आहे. ते मोरमोन्सला आदर्श अल्पसंख्याक समूहाचा दर्जा देतात. व्यापारातील त्यांच्या यशाला मुलांच्या देखभालीशी जोडण्यात आले आहे. ट्रिपल पॅकेजचा मोठा भाग न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरितांवर केंद्रित आहे.