आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sukrta Karandikar Article About Munde Brand In Maharashtra

"मुंडे'' आडनावाचा पवारांचा मोहरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्राच्या राजकारणात 'मुंडे'आडनाव मोठे झाले ते केवळ गोपीनाथरावांमुळेच. ऐंशी-नव्वदच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नाड्या हातात ठेवणाऱ्या शरद पवार यांना लक्ष्य करून गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचे राजकीय अस्तित्व निर्माण केले. 'ब्रँड मुंडे' प्रस्थापित झाला त्याचा पाया आक्रमक पवारविरोध हा होता. याच गोपीनाथ मुंडे यांचा सख्खा पुतण्या पुढे जाऊन पवारांच्या गोटात सामील झाला. साहजिकच मुंडे यांना अखेरच्या क्षणापर्यंत याचे शल्य बोचत होते. ह्लधनंजयने माझी साथ सोडली यापेक्षाही त्याने पवारांचा हात धरला,ह्व याच्या वेदना मुंडेंना सर्वाधिक होत्या.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोपीनाथ मुंडे पुण्यात आले होते. त्या वेळी धनंजयचा विषय निघालाच. तोवर धनंजय मुंडे यांनी ह्यराष्ट्रवादीह्णकडून प्रचाराचा धडाका लावला होता. काकांवर टीका होतच होती. पण गोपीनाथरावांनी कधी प्रत्युत्तर दिले नाही. खासगी गप्पांमध्ये मुंडे म्हणाले होते - ह्लमला किती वेदना होतात हे मी कुणालाच सांगू शकत नाही. धनंजयला पवारांचे राजकारण अजून माहिती नाही. मी आयुष्यात कधीच पवारांचा मिंधा राहिलो नाही ना कधी त्यांची कसली मदत घेतली; म्हणूनच राजकारणात मी टिकून आहे. पवारांना समजून घ्यायला त्याला वेळ लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात जो-जो पवारांच्या सावलीत गेला तो संपला. धनंजयकडे दूरदृष्टी नाही. त्याने संयम दाखवायला हवा होता.ह्व काकांचे शब्द पुतण्याच्या बाबतीत खरे ठरतात की कसे, हे येणारा काळ ठरवेल. तूर्तास काकांनीच प्रस्थापित करून ठेवलेल्या ह्यब्रँड मुंडेह्णमुळे पुतण्याला सध्याच्या राजकारणात पुढे चाल मिळाली. गोपीनाथ मुंडे यांचा पुतण्या या भांडवलावर त्यांना यापूर्वी भाजपमधील पदे मिळत गेली. बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर विनासंघर्ष स्थान मिळाले. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची मोठी जबाबदारी धनंजय यांच्यावर आलीय. ह्यमुंडेह्ण या आडनावामुळे मिळालेली ही सर्वोच्च संधी म्हणावी लागेल. बीड जिल्ह्यातील स्थानिक राजकारणासाठी धनंजय मुंडे ह्यराष्ट्रवादीह्णसाठी महत्त्वाचे आहेत. त्यापेक्षा राज्याच्या राजकारणात एक ह्यमुंडेह्ण आपल्याकडे असणे ह्यराष्ट्रवादीह्णला आवश्यक वाटते. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर सहानुभूतीची प्रचंड लाट निर्माण झाली. सर्व थरातून हळहळ व्यक्त झाली. या सर्वातून पंकजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द मार्गाला लागली. पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री झाल्या. या सर्वाला शह देण्यासाठी ह्यमुंडेह्ण आडनावाच्या मोहऱ्याला ताकद देणे ह्यराष्ट्रवादीह्णच्या नेतृत्वाला संयुक्तिक वाटावे यात नवल नाही. धनंजय यांनाही आता कॅबिनेट दर्जा मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे धनंजय यांना लाल दिव्याची गाडी मिळाल्यानंतर पंकजा मुंडे ज्या तीव्रतेने चरफड व्यक्त करीत सुटल्या आहेत, ते पाहता धनंजय यांचे आव्हान त्यांना किती खडतर वाटते, हे स्पष्ट होते. थोडक्यात ह्यमुंडे विरुद्ध मुंडे' ही पवारांची खेळी यशस्वी ठरते आहे. अर्थात केवळ ह्यमुंडेह्णवलयामुळेच धनंजय यांना संधी मिळाल्याचे म्हणणे अन्यायकारक ठरेल. ह्यराष्ट्रवादीह्णकडे पर्यायच नव्हता हीदेखील वस्तुस्थिती आहे. सुनील तटकरे हेज्येष्ठ आमदार आणि प्रदेशाध्यक्ष विधान परिषदेत आहेत. परंतु, तटकरेंच्या विरोधात उठलेले आरोपांचे मोहोळ लक्षात घेता ते कोणत्या तोंडाने सरकारला धारेवर धरतील हा प्रश्नच होता. स्वतः धनंजय मुंडे यांच्यासाठी मात्र खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी आहे. येत्या पाच वर्षांत केवळ विशिष्ट समाजाचे किंवा बीडसारख्या एका जिल्ह्याचे नेते म्हणून नव्हे तर ह्यराज्याचे नेतृत्वह्ण म्हणून उदयाला येण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची संधी विरोधी पक्षनेतेपदाने त्यांना दिलीय.
धनंजय मुंडेंकडेही त्यांच्या काकांप्रमाणेच आक्रमक व्यक्तिमत्त्व आहे. प्रभावी वक्तृत्व आहे. युवकांना जोडून घेण्याची कला त्यांना अवगत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील हे धनंजय यांच्या तुलनेत मवाळ आणि संयमी आहेत यामुळे विधिमंडळात चर्चेत राहण्यात धनंजय बाजी मारू शकतात. अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे या ह्यराष्ट्रवादी'तील वरिष्ठ सहकाऱ्यांची प्रतिमा डागाळलेली आहे. आर. आर. पाटील यांच्यापुढे प्रकृती अस्वास्थ्याची समस्या आहे. जितेंद्र आव्हाड यांचा तोंडवळा शहरी आहे. यामुळे पक्षातसुद्धा पहिल्या फळीचे नेते म्हणून सिद्ध होण्यास अनुकूलता आहे.
विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारताना धनंजय यांनी काकांची आठवण काढली. विरोधात असताना केलेल्या टोकाच्या संघर्षामुळेच गोपीनाथ मुंडे राज्यात लोकप्रिय झाले होते, हेही धनंजय मुंडे यांनी लक्षात ठेवले असणार. शेवटच्या कार्यकर्त्यालाही आठवणीने वेळ देण्याची सवय, सर्व पक्षातल्या आमदार-नेत्यांशी जपलेली व्यक्तिगत मैत्री, पायाला भिंगरी लावल्यागत सततचा प्रवास-दौरे, विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी संबंध जोडण्याची कला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभ्यासपूर्ण वक्तृत्व या बळावर गोपीनाथ मुंडे ह्यलोकनेतेह्ण बनले. विरोधक गोपीनाथ मुंडे जनतेत सर्वाधिक लोकप्रिय होते. काकांच्या सावलीतून बाहेर पडण्यासाठी धनंजय मुंडे यांना काकांचीच वाट चोखाळावी लागेल. राजकीय कारकीर्दीची लांबी आणि उंची वाढवण्यासाठी धनंजय मुंडेंकडे विरोधी पक्षनेतेपदाची पाच वर्षे आहेत. ही संधी दवडली तर त्यांची ओळख ह्यमुंडे आडनावाचा पवारांचा मोहराह्ण इतपतच उरेल.