आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: मराठ्यांच्या गर्दीचा विधिमंडळाला धसका; श्रेयासाठी सत्ताधारी-विरोधकांमध्ये स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर अधिवेशन, 8 डिसेंबर.
अलिकडच्या काही महिन्यात महाराष्ट्रात, देशात आणि थेट विदेशात मिळून निघालेल्या मराठा मूक मोर्चांची संख्या 55 आहे. तालुका स्तरावर अजूनही अनेक मोर्चे निघताहेत. या प्रत्येक मोर्चात सहभागी मराठ्यांची संख्या किमान एक लाखापासून ते थेट चाळीस-पन्नास लाखांपर्यंत असल्याचे दावे करण्यात आले आहेत. मोर्चेकऱ्यांच्या संख्येपेक्षा डोळे दिपवणारी आणि थक्क करुन सोडणारी बाब आहे ती या मोर्चांमधली शिस्त आणि शांतता.

मोर्चे 'मूक' असूनही त्याच्या कानठळ्या राजकारण्यांना बसताहेत. असले मोर्चे ना कधी देशानं पाहिले ना जगाच्या इतिहासात निघाले. या मोर्चांचं विश्लेषण करायला अनेक दशकं जावी लागतील बहुधा. सर्वार्थानं अभूतपुर्व असणाऱ्या या सकल मराठा क्रांती मूक मोर्चाचा पुढचा अविष्कार येत्या 14 डिसेंबरला नागपुरात पाहायला मिळणार आहे. नागपुरात अनेक ठिकाणी होर्डींग लागलीत. एफएम रेडिओवर जाहिराती ऐकू येताहेत. सोशल मिडीया, व्यक्तीगत संपर्क यातून राज्यभर मोर्चाची तयारी सुरु आहे. विधीमंडळ अधिवेशनावर मराठ्यांचा मोर्चा प्रचंड संख्येने येतोय. याच प्रचंड संख्येच्या मराठ्यांची धास्ती महाराष्ट्राच्या विधीमंडळानं घेतल्याचं स्पष्टपणे जाणवतंय. यंदाचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं तेव्हाच मराठा मूक मोर्चा येणार असल्याचं सर्व राजकीय पक्षांना माहिती होतं. पण "14" तारीख जसजशी जवळ येतीय तसतसं सर्वच राजकीय पक्ष अतिशय सावध होताहेत.

पुढील स्लाइडवर वाचा... श्रेयासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोपबाजीचा रंगतोय अंक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...