आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: आईनं मोठा केलेला ब्रँड \'सावजी\'; मांसाहारी पदार्थांचा झटका झाला लोकप्रिय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर अधिवेशन, 10 डिसेंबर.
ब्रँड तयार होतो कसा? जगावेगळं, नाविन्यपूर्ण काहितरी द्यावं लागतं किंवा तसं करत असल्याच्या भास तरी निर्माण करावा लागतो. 'ब्रांड' जन्माला घालण्याची ही पहिली पायरी. मग पुढं ग्राहकांचा विश्वास जपण्यासाठी दर्जाशी तड़जोड करुन चालत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्याला सातत्याची अखंड जोड द्यावी लागते. मग 'ब्रांड'ची मोहर उमटते.

हेही वाचा...BLOG: नारायण राणे का चिडले? बाबुरावांनी ट्रकमध्ये त्यांची गाडी घालून पार केला ओढा!

मिसळ, भेळ, मांसाहारी-शाकाहारी थाळ्या, लस्सी, मस्तानी, चहा वगैरेंचे कित्येक 'ब्रांड' प्रांतोप्रांती दिसतात ते यामुळंच. नागपुरी संत्रं, देवगड हापूस, सांगलीची हळद, मंगळवेढयाची ज्वारी, कोल्हापुरचा गुळ, खान्देशातली भरताची वांगी, सांगोल्याची डाळींबं, उमराणी बोरं, भिलार-महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, झालंच तर गोव्याची फेणी (एका मित्राची वात्रट यमकगिरी ! 'वेणी'च्या सोबतीशिवाय 'फेणी'ची मजा नाही. विशेष सूचना : आपापल्या जबाबदारीवर अनुभव घेणे.) असे कित्येक ब्रांड अनोखी चव आणि दर्जातल्या सातत्यामुळं त्यांची लोकप्रियता टिकवून आहेत.

हेही वाचा...
BLOG: 'सावजी मटण' आणि पर्यटनाचे बेत, सरत्या आठवड्यातली काही प्रमुख नेत्यांची लक्षात राहिलेली वक्तव्यं
BLOG: मराठ्यांच्या गर्दीचा विधिमंडळाला धसका; श्रेयासाठी सत्ताधारी-विरोधकांमध्ये स्पर्धा

पुढील स्लाइडवर वाचा... 'सावजी'च्या नावानं थाटलेली हाटेलं आता पुण्यातही

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...