आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: जेरुसलेम- ज्यूंच्या विजिगीषू, खमकेपणाचं प्रतिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1967 मध्ये तिसऱ्यांदा जेरुसलेम मुसलमानांच्या हातातून निसटलं, त्याला यंदाच्या जूनमध्ये पन्नास वर्षे पूर्ण होतील. ज्या प्रार्थनास्थळावरुन प्रेषित मोहम्मदाने स्वर्गारोहण केले त्या अल-अक्सा मशिदीवर ज्यू सैनिकांनी इस्रायली राष्ट्रध्वज फडकवला. जेरुसलेमवरचा विजय ज्यू लोकांच्या विजिगीषू आणि खमक्या स्वभावाचं प्रतिक आहे. अल-अक्सा मशिदी ज्यू सैनिकांच्या पहाऱ्यात असल्याची बाब मुसलमानांना त्रास देणारी आहे.

ख्रिश्चन, मुसलमान आणि ज्यू धर्माचं माहेरघर असेललं जेरुसलेम वरपांगी शांत आहे. अल-अक्सा मशिदीत आताही दर शुक्रवारी हजारो मुसलमानांच्या नमाजाची गाज ऐकू येते. शनिवारी ज्यू लोकांची हिब्रुतली स्तोत्रं वेस्टर्न वॉलपाशी गुंजतात. रविवारी ख्रिश्चनांच्या चर्चमधल्या घंटा निनादतात. द चर्च ऑफ द सेपल्कर इथं जिझसला दफन केलं होतं. इथंच तळघरात आदिमानव अँडम (सफरचंद) कबरीत निजलेला आहे. अशा अनेक प्राचिन ज्ञात-अज्ञात, विवादीत इतिहासाची ओझी वागवत छोट्या-मोठ्या टेकड्यांवरचं जेरुसलेम पुढं जात आहे. पावलोपावली काही शे-हजार वर्षांचा इतिहास वागवणाऱ्या या पवित्र शहरात चारदा जाऊन आलो. प्रत्येकवेळी जेरुसलेम प्राचिन इतिहासातलं नवं पान पुढ करतं. बहुतेकदा ते रक्त आणि अश्रूनं माखलेलंच असतं.

पुढील स्लाइलवर वाचा... जगाच्या पाठीवर अनेक देशांकडून ज्युंची ससेहोलपट झाली. पण, मातृभूमीचा कधी विसर पडू दिला नाही....
बातम्या आणखी आहेत...