आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळिशीनंतर अशी घ्या स्वत:ची काळजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळिसाव्या वर्षापर्यंत महिला स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असतात. कुटुंब आणि मुलांकडे त्यांचे लक्ष असते. मात्र, त्यांना प्रसूती तथा प्रजननविषयक प्रकृतीबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
वजन नियंत्रणात ठेवणे : वाढत्या वयानुसार चयापचय प्रक्रिया मंदावत जाते. आहाराचे प्रमाण कमी न झाल्याने 20 ते 30 टक्के महिला वजन वाढण्याच्या समस्येला सामो-या जातात.
वजन कमी ठेवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. जेवणात तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात सेवन करावेत. अँटी ऑक्सिडंट्स असलेले अन्न अधिक प्रमाणात सेवन करावे. ताजी फळे आणि पालेभाज्यांमधून अँटी ऑक्सिडंट्स मिळतात. नियमित व्यायाम केल्याने कॅलरीज बर्न करता येतात. धूम्रपान करणा-या महिलांनी ही सवय सोडावी तसेच अल्कोहोल घेणा-या महिलांनी हे प्रमाण कमीत कमी ठेवावे. या सवयी नियंत्रणात आणल्याशिवाय रक्तदाब, रक्तशर्करा आणि कोलेस्टेरॉलचे यांचे प्रमाण नियंत्रणात ठेवाता येणार नाही.
तणावावर नियंत्रण : सतत तणावात राहिल्यास मधुमेह आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढतो. योग, ध्यानधारणा, व्यायाम, पुरेशी झोप घेतल्याने तणावरहित जगता येते. मन आनंदी ठेवणा-या कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवा. मित्र-मैत्रिणींबरोबर वेळ घालवा. बगिचात फिरा. संगीताचा आनंद घ्या. यामुळे तणाव दूर होतो.
आरोग्य तपासणी आवश्यक : ब्रेस्ट आणि सर्व्हाइकल कॅन्सर तसेच सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्सची तपासणी नियमितपणे केली पाहिजे. दरवर्षी मॅमोग्राफी आणि पेप टेस्ट करणे आवश्यक आहे. अशा आजारांचा आनुवंशिक इतिहास असल्यास या तपासण्या नियमितपणे करणे अत्यावश्यक आहे. काही महिलांना अनियमित पाळी किंवा अतिरिक्त रक्तस्रावाची समस्या असते. याकडे दुर्लक्ष करू नका. तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
चाळिशीनंतर महिलांची प्रजनन क्षमता कमी होते. मात्र, 40 व्या वयापर्यंत नियमित गर्भनिरोधक गोळ्या घेता येतात. 50 हून अधिक वयाच्या महिलांनी बोन मिनरल डेन्सिटी स्कॅन करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.