आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसआयपीवर विसंबून राहणे अडचणीचे ठरू शकते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसआयपीचा मुख्य उद्देश आपल्याच रकमेत वाढ करण्याचा आहे. हा पैसा शेअर बाजारात मंदी सुरू असताना लावणेच योग्य ठरते. शेअर बाजारात तेजी असेल तर यात पैसे गुंतवणे म्हणजे फायदा कमी मिळणे, असा अर्थ आहे. ज्यांना सुरुवातीला जास्तीची गुंतवणूक करण्याची इच्छा नसते, त्यांच्यासाठी ही बाब उपयुक्त ठरते. तथापि एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यावर शेअर बाजारातील चढ-उताराचा जास्त परिणाम होत नाही, परंतु केवळ यावरच अवलंबून राहणे जोखमीचे ठरू शकते.

डोळे बंद करून यावर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारे गुुंतवणूक करण्याने कमी फायदा मिळतो आणि खूप नुकसानही होऊ शकते. जर बाजारात मंदी असेल आणि या वेळी खरेदी केल्यास आणि खरेदी बाजारात तेजी असेल तर फायदा होणारच! जर एखाद्यास पुरेसा परतावा पाहिजे असेल तर सर्व खरेदी मंदीच्या काळातील बाजारात केली पाहिजे. यामुळे सरासरी मूल्य सुरुवातीला केलेल्या खरेदीपेक्षाही कमी असतील.

एकरकमी पैसे गुंतवणे
एसआयपीमुळे गुंतवणूकदाराला सतत बचत करण्याची सवय लागते. ते बाजाराच्या चढ-उताराच्या हिशेबाने काम करते. जर तुम्ही एसआयपीच्या भरवशावर असाल तर निराशा पदरी पडेल. योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याच्याही मर्यादा असतात. तरीसुद्धा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा हा उत्तम मार्ग मानला गेला आहे. एसआयपीला वेगळ्या प्रकारे पाहू नये. एसआयपीबरोबरच अन्यत्र एकरकमी गुंतवणूक करून नुकसान टाळता येते. पैशाची आवक चालू राहण्यासाठी उत्पन्नाचा एक भाग वेगळा ठेवावा लागतो. उदाहरणार्थ, जर नोकरीत काही बोनस रक्कम मिळत असेल तर ती एकरकमी गुंतवणुकीसाठी ती ठेवण्यात यावी. जर एसआयपीबरोबरच एकरकमी गुंतवणूक होत असेल तर यात परतावा तर जास्त मिळेलच पण एक चांगली रक्कम तयार होते. यामुळे चढ-उतार असली तरी तुमची आर्थिक परिस्थिती वाईट होणार नाही. नोव्हेंबर २००३ पासून नोव्हेंबर २००८ पर्यंत पाच वर्षांच्या कालावधीत एसआयपीची सुरुवात झाली होती. बाजार उंचावर जाण्याआधीची ही परिस्थिती होती. बाजार कोसळल्यानंतरही एकरकमी गुंतवलेली रक्कम १२.५० टक्के परतावा मिळालेला आहे. तरीही या अवधीत एसआयपीचा इंटर्नल रेट आॅफ रिटर्न (आयआरआर) ०.४८ टक्केच होता. तरीसुद्धा अशी स्थिती पुन्हा तयार होईल, अशी शक्यता नाही.

एसआयपीमध्ये फ्लेक्सी अमाउंट
कोणीसुद्धा बचत करताना आपल्या निवृत्तीप्रमाणेच करावी. दर महिन्याला काही रक्कम काढून ठेवावी. इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर दीर्घ मुदतीसाठी पैसे उभे करावे लागतील. जर कोणी एसआयपी करत असेल तर ते पुरेसे नाही. कोणाचेही उत्पन्न भविष्यात तितके राहणार नसते, हे यामागचे कारण आहे. यासाठी एसआयपीची रक्कम ठरावीक नसावी. तुमची ग्रोथसुद्धा वाढत्या उत्पन्नाबरोबरच वाढलेली असावी. जर एसआयपीची रक्कम ठरवली असेल तर यात रक्कम वाढवता येत नाही. कारण तुम्ही त्या बँकेत इसीएसचा मँडेट भरलेला नसतो. यासाठी तुम्हाला मँडेट बदलावा लागतो. ही अडचण फ्लेक्सी एसआयपीमध्ये नाही. ती ऑनलाइनच मिळते. याद्वारे जेव्हा तुम्ही एसआयपीमध्ये रक्कम वाढवू किंंवा घटवूही शकता. ज्यांना दरमहा किती रक्कम द्यायची आहे हे माहिती नसते, त्यांच्यासाठी हा पर्याय खूप चांगला आहे. कारण बचत नेहमी कमी किंवा जास्त असू शकते. फ्लेक्सी एसआयपी ऑनलाइन घेतली जाऊ शकते.

सुरेशकुमार नरुला
सेबीचे अधिकृत गुंतवणूक सल्लागार, तसेच फायनान्शियल प्लॅनिंग गिल्ड आॅफ इंडियाचे सदस्य