Home | Divya Marathi Special | sushilkumar-shinde-sudhash-deshmukh-story

सुशिलकुमार शिंदे अन् सुभाष देशमुख यांच्यात झालीय छुपी युती

अरुण रामतीर्थकर, सोलापूर | Update - Jun 04, 2011, 04:24 PM IST

सोलापूर जिल्ह्यात मात्र असा गजावाजा न होता गेली 6 महिने एका वेगळ्याच युतीची लोकांत चर्चा आहे.

 • sushilkumar-shinde-sudhash-deshmukh-story

  महाराष्ट्राच्या राजकारणात भीमशक्ती आणि शिवशक्ती यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. जागोजागी मेळावे होत आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यात मात्र असा गजावाजा न होता गेली 6 महिने एका वेगळ्याच युतीची लोकांत चर्चा आहे. राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याचे प्रत्यंतर आणून देणारी ही छुपी युती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, अनेक वेळा राज्याचे अर्थमंत्री, आंध्रचे राज्यपाल, आता केंदात ऊर्जामंत्री, एकेकाळचे उपराष्ट्रापतीपदाचे उमेदवार असे सर्वतोमुखी नाव असलेले सुशिलकुमार शिंदे आणि ाजपचे माजी खासदार सुाष देशमुख यांच्यात गुळपीठ जमलेले आहे.
  2 महिन्यांपूर्वी देशमुख यांच्या लोकमंगल उद्योगसमूहाच्या लागोपाठ 2 कार्यक्रमांना शिंदे यांनी उपस्थिती दर्शवून या चर्चेला तोंड फोडले आहे. वास्तविक 2004 साली झालेल्या लोकस
  ा निवडणुकीत शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा सुाष देशमुख यांनी पराव केला होता. पत्नीचा पराव शिंदे यांना जिव्हारी लागला होता. त्यामुळे अशी युती होणे अशक्य वाटत होते. पण राजकारणात काहीही होऊ शकते याचा अनुव आता सोलापूरकरांना येऊ लागला आहे.  शिंदे देशमुख छुप्या युतीला अनेक पदर  पहिली पदर कॉंग्रेस अंतर्गतच आहे. सोलापूर शहर शिंदे यांच्या ताब्यात तर जिल्हा अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ताब्यात अशी शक्तीची विागणी गेल्या 30 वर्षांपासून आहे. वरून कीर्तन आतून तमाशा अशी या दोघांची मैत्री होती. शिंदेंना पाडण्यासाठी मोहिते आणि मोहित्यांना पाडण्यासाठी शिंदे प्रयत्नशील असल्याची जोरदार चर्चा 1991 साली होती. त्यामुळे निवडणकीच्या वेळी दोघांनी सोलापूरच्या डाक बंगल्यावर पत्रकारपरिषद घेऊन त्याचा इन्कार केला होता. आता राष्ट्रवादी वेगळी झाल्यावर शिंदे अन मोहिते वेगवेगळ्या पक्षात असले तरी जिल्ह्यात कॉंग्रेस नाही आणि शहरात राष्ट्रवादी नाही, ही पूर्वीची स्थिती कायम आहे.
  2 वर्षांपूर्वी झालेल्या विधानस
  ा निवडणुकीत विजयसिंह यांचा आश्चर्यकारक पराव झाला. त्यानंतर झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मोहिते पाटलांच्या तावडीतून 4 कारखाने निसटले. हे कारखाने शिंदेंकडे नसले तरी मोहित्यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी सहकार क्षेत्रात रीव कामगिरी केलेल्या देशमुख यांची मदत शिंदेंना आवश्यक वाटतेय. कारण देशमुख यांच्या लोकमंगलचा पसारा शहरापेक्षा जिल्ह्यात अधिक आहे.  विकास कामे करताना पक्षीय जोडे बाजूला ठेवायला हरकत नाही. केवळ निवडणुकीपुरतेच राजकारण करावे असे म्हणायला शिंदे मोकळे आहेत. आणि 10 जनपथवर शिंदे यांची इतकी जान पहचान आहे की त्यांच्या निर्णयाविरोधात कोणी शहर जिल्ह्यातील पदाधिकारी जाण्याची शक्यताच नाही.  सुाष देशमुख यांची अडचण  सोलापुरात विमानसेवा सुरू होऊन बंद झाली. त्याची चर्चाही खूप झाली. देशमुख खासदार असताना अनेक विमान कंपन्यांशी चर्चा, पत्रव्यवहार करून विमानसेवा सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे किंगफिशरच्या विजय मल्लया यांनी विमानसेवा सुरू करण्याची तयारीही दर्शविली. परंतु त्यांच्यावर दबाव आल्याने त्यांनी माघार घेतली. देशमुखांना विमानसेवेचे श्रेय मिळू नये यासाठी हे कृत्य कोणी केले हे उघड आहे. त्याचप्रमाणे सोलापुरात बंद पडलेल्या सोलापूर आणि यशवंत या दोन सूत गिरण्या चालू करण्याची तयारी सुभाष देशमुख यांनी दर्शविली होती. या दोन्हीत मिळून 13 हजार कामगार होते. त्यांचा बुडालेला रोजगार सुरू झाला असता, परंतु महाराष्ट्र शासनाने देशमुखांना विचित्र अटी घातल्या. दोन गिरण्यांची पूर्वीची देणी, सरकारी कर, विजेचे आधीचे बिल, थकीत पगार, प्रॉव्हिडंट फंड, अडलेली रक्कम आधी द्या मग गिरणी चालवा या त्या अटी होत्या. ही देणीच 35 ते 36 कोटीच्या आसपास होती.  सुभाष देशमुख यांचे म्हणणे होते की, कामगारांना एका महिन्याचा पगार आगाऊ देतो, पण मागच्या देणीशी माझा संबंधच नाही. सरकारकडून 1 रुपयाचीही मदत नको, माझ्या हिंमतीवर पगार देऊन कापूस खरेदी करेन. खुद्द शरद पवारही 13 हजार कामगांरांना पुन्हा काम मिळणार म्हणून गिरणी चालवायच्या मानसिकतेचे होते. पण पुन्हा एकदा सुभाष देशमुखांना श्रेय मिळेल या भीतीने गिरणी चालविण्यास देण्याचा प्रस्ताव अमान्य झाला. गिरणीची मालमत्ता विकण्यात आली आणि सोलापूरकरांचा रोजगार कायमचा बुडाला.  विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील किल्लारी आणि तुळजाभवानी ही दोन्ही तोट्यात येऊन बंद पडलेली साखर कारखाने 5 वर्षाच्या कराराने सुभाष देशमुख यांनी चालवायला घेतल्या आहेत. याचे श्रेय सुभाष देशमुखांना मिळाले तरी लातूरच्या विलासराव देशमुखांचे काहीही नुकसान नव्हते. पण सोलापुरात राजकीय आकसापोटी सुभाष देशमुख यांची कोंडी होत होती. त्यामुळे देशमुख अस्वस्थ होते.  सहकार्याचा नवा पॅटर्न
  जुने बंद कारखाने सुरू करण्याचा नाद सोडून सुभाष देशमुखांनी नवीन कारखान्यांची उभारणी केली आहे. डेअरी प्रकल्प, जैविक तंत्रज्ञान महाविद्यालय, रुग्णालय असे अनेक लोकमंगलचे प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. सुभाष देशमुख यांचा आवाका आणि धडाडी वादातीत असून ते भाजपाशी एकनिष्ठ आहेत, हे यापूर्वी अनेकदा सिद्ध झाले आहे.
  सु
  भाष देशमुख भाजपा सोडण्याची शक्यता नाही किंवा सुशीलकुमार शिंदे कॉंग्रेस सोडण्याची शक्यता नाही, तरी त्यांची छुपी युती कशी असा प्रश्र साहजिक आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे आणि देशमुख हे सहकार्याचा नवा पॅटर्न आणत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आणखी 3 वर्षे लांब आहेत. या तीन वर्षात लोकमंगलच्या आणखी अनेक प्रकल्प सुरू होणार आहेत. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या सहकार्याची देशमुखांना गरज पडणार आहे. जिल्ह्याच्या विकास कामात मी नेहमी सहकार्य करेन असे आश्वासन गेल्याच महिन्यात सुशीलकुमार शिंदे यांनी लोकमंगलच्या भंडारकावठेच्या कार्यक्रमात जाहीर केले आहे.  आजवरच्या नियमांना छेद देणारा पॅटर्न  आजवर कॉंग्रेसची नीती अशी होती की विकासकामे करायची असतील तर कॉंग्रेसमध्ये या अशा अटी टाकीत. सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागा कारखान्यास मोहिते गटाकडून खूप अडथळे येत होते. त्यामुळे कारखाना आकारास येत नव्हता. 1995 साली वसंत काळे युतीचे मुख्यमंत्री मनोहर जोशींना भेटले. अडचणी दूर होऊन कारखाना सुरू झाला. युतीचे राज्य जाताच काळेंवर दबाव आला. त्यांना कॉंग्रस प्रवेश करावा लागला. आपली कामे सुलभ व्हावीत म्हणून कॉंग्रेस प्रवेश झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु सोलापूरचा शिंदे देशमुख युतीचा हा पॅटर्न आजवरच्या नियमांना छेद देणारा आहे. तुम्ही तुमच्या पक्षात, मी माझ्या. निवडणूक सोडून साडेचार वर्षे एकत्र काम करू, अशी ही विचारांची नवी दिशा आहे. अर्थात हा प्रयोग किती दिवस टिकेल हा प्रश्र आहे. पण विजयसिंह मोहिते पाटील गट पूर्णपणे नामशेष होणे ही सुशीलकुमार शिंदे यांची गरज आहे तर भावी प्रकल्प लाल फीतीत अडकू नयेत ही सुभाष देशमुख यांची गरज. त्यातून ही गुपचूप युती आकारास आली आहे.  ही युती किती काळ चालेल हा प्रश्र असला तरी जेवढा काळ चालेल त्या काळात जिल्ह्यासाठी काही भरीव योगदान मिळावी, अशी आशा करायला काय हरकत आहे.  आपले मत
  या लेखावारिल तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. शिंदे - देशमुख छुप्या युतिमागे आणखी काही कारणे असू शकतील? तुम्हाला काय वाटते ? आपले मत पुढे दिलेल्या कॉमेंट बॉक्समधुन व्यक्त करावे. आपल्या मतांसाठी वाचक स्वत: जबाबदार असेल.Trending