आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुगंधी बुटांवर केला एम्ब्रॉयडरीचा प्रयोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात पायांच्या दुर्गंधीची समस्या सर्वसामान्य आहे. पण पर्निया कुरेशी यांचे बुटांचे नवीन कलेक्शन यापेक्षा निराळे आहे. त्यांच्या सोलमध्ये "फ्रुटी फ्रॅगरन्स' टाकले आहे. त्यामुळे ते धुतल्यानंतरही कायम राहते. बूट घालण्यास आरामदायक आहेत हे याचे वैशिष्ट्यआहे. हे बूट कुठल्याही ड्रेस व कुठल्याही कार्यक्रमांना घालता येऊ शकतात. जाणून घेऊ या या विषयी...

बूट प्रत्येकाच्या ड्रेसचा एक मुख्य भाग अाहे.  योग्य बुटांची निवड ही आमच्या पोशाखाला एक वेगळा आयाम देते. प्रत्येक मुलगी सुंदर आणि आरामदायक बूट घालण्याची इच्छा बाळगते. परंतु, असे बूट शोधणे फार कठीण आहे. मात्र, यात पर्निया कुरेशी यांचे नवीन कलेक्शन त्यांची मदत करू शकतात. पर्निया यांनी नुकतेच "शू ड्रिम' कलेक्शन लॉन्च केेले आहे. आठ वेगवेगळ्या डिझाइनचे "स्लिप-ऑन शूज'चे सुगंधीत सोल हे या कलेक्शनचे वैशिष्ट्य आहे. 

आपले पॉप-अप शॉपच्या लॉन्चिंगनंतर पर्निया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वत:ची प्रतिभा दाखवत आहे. एक फॅशन उद्योजक अशी  प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्यांनी आपले "क्लोदिंग लेबल' लॉन्च केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पहिले ज्वेलरी कलेक्शन "स्वारोव्स्की' सोबत लॉन्च केले. त्याचे नाव "इंटरस्टेलर' होते. ते खूप प्रसिद्ध झाले आणि आता सेंटेड फुटवेअर ब्रॅण्ड "सेंट्रा'साेबत हे नवीन बुटांंचे कलेक्शन घेऊन आल्या आहेत. पर्निया सांगतात, सुगंधीत आणि आरामदायक सोल हेच सेंट्रा सोबत जुळण्याचे मुख्य कारण आहे.  सेंट्रा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि गुणवत्तेवर अधिक जोर देतात. यांचे बूट कॅलिफोर्नियामध्ये डिझाइन झाल्यानंतर ते स्पेनमध्ये तयार केले जातात. 

सोलमध्ये सुगंध असल्यामुळे पायांची दुर्गंधी येत नाही. बिना मोज्यांचीही दुर्गंधी येत नाही.सोलमध्ये "फ्रुटी फ्रेगरेंस' टाकण्यात आले आहे. त्यामुळे बुटांचा सुगंध धुतल्यानंतरही कायम राहतो. विशेष करून याचे आठ प्रकारचे डिझाइन युवक व युवतींसाठी आहेत. ते वर्कप्लेस, प्रवास, घरी देखील वापरू शकतात. यावर एम्ब्रॉयडरी केल्याने त्यांना वेगळाच लूक प्राप्त झाला आहे. लोक सकाळपासून सायंकाळपर्यंत परिधान करू शकतील, असे काहीतरी बनवण्याची इच्छा होती. हल्ली फॅशनचा जोर कन्फर्टवर असून  हे कलेक्शन महिला स्केटर ड्रेस, ट्रॅक पॅन्ट अथवा जीन्ससोबत घालू शकतात.

फुटवेअरमध्ये बदलाचा काळ 
फुटवेअर क्षेत्रात नवीन डिझाइनर आल्याने याचे स्वरून बदलत आहे. स्लिप ऑन व स्निकर्सचा वापर वाढत आहे. तरी देखील हिल्स खूपच कमी लोक घालणे पसंत करत आहे. वेगवेगळ्या उत्सवांना सर्वाधिक फ्लॅट्स घातले जात आहे.

- अस्मीता अग्रवालफॅशन लेखिका, नवी दिल्ली
बातम्या आणखी आहेत...