आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियन कलाकाराने जागतिक नेत्‍यांना दाखवले निर्वासित, दु:ख आणि संतापाची अशी एक कलाकृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिरियन कलाकार अब्दुल्ला ओमरी यांनी जागतिक स्तरावरील काही वादग्रस्त नेत्यांवर उपहासात्मक कलाकृती सादर केली आहे. या कलाकृती सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. स्वत:च्या देशातून स्थलांतरीत होऊन इतर देशांना शरण जाण्याचे दु:ख काय असते, हे चित्राच्या माध्यमातून तरी या बड्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

ओमरी यांनी इन्स्टाग्राम आणि इतर सोशल वेबसाइट्सवर या कलाकृती अपलोड केल्या आहेत. हे नेते निर्वासिताच्या रूपात कसे दिसतील, याची कल्पना चित्रांच्या माध्यमांतून त्यांनी मांडली आहे. या चित्रांमध्ये सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प, बराक ओबामा, जर्मन चान्सलर अँगेला मर्केल, रशियन अध्यक्ष पुतीन, उत्तर कोरियाचे प्रशासक किम जोंग, चीनचे शी जिनपिंग, फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद, तुर्कीचे अध्यक्ष रेचप तैय्यप इत्यादींचा समावेश आहे.

ओमरी म्हणतात, सिरियातील ५० लाखांहून अधिक नागरिक ७ वर्षे इतर देशांत निर्वासितांचे आयुष्य जगत आहेत. मलाही माझा देश सोडावा लागला. हे अनुभव मी कॅन्व्हासवर उतरवण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प सिरियावर क्षेपणास्त्रे डागतात, असददेखील आपल्याच नागरिकांवर रासायनिक हल्ले करतात. पुतीन असद यांना पाठिंबा देतात. त्यामुळे लाखो नागरिकांच्या विस्थापनासाठी हे नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, जागतिक नेत्‍यांची उपहासात्‍मक चित्रे...
बातम्या आणखी आहेत...