आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात काळजी घ्या अन‌् त्वचा ठेवा निरोगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात तापमान वाढण्यासोबतच अल्ट्रावॉयलेंट किरणांची तीव्रता वाढते. त्याचा थेट त्वचेवर प्रभाव पडतो. मुलींना टॅनिंग, घाम, पुरळ, त्वचेची अॅलर्जी, तेलगट त्वचा आदी समस्येला तोंड द्यावे लागते. सूर्याची तापलेली किरणे त्वचेमधील ओलावा शोष्ून घेतात. जर याची व्यवस्थित काळजी न घेतल्यास  नुकसान होऊ शकते. याकरिता एका मॉश्चराइजरसोबत एसपीएफ ३० युक्त सनस्क्रीनचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात त्वचा प्रभावित होण्यापासून वाचवता येऊ शकते. याशिवाय जाणून घ्या उन्हाळ्यात त्वचेचे रक्षण करणाऱ्या पद्धती...

पाणी ठेवेल स्किनला फ्रेश : उन्हाळ्यात खूप पाणी प्यायला हवे. यामुळे त्वचा ताजी राहते. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव पडते.

सोडा सेवन करू नये : उन्हाळ्यात सोडा, डबाबंद ज्यूस आणि सोडा मिश्रित थंडपेय सेवन करण्यापासून टाळले पाहिजे. त्याऐवजी नारळाचे पाणी, ताक, कैरीचे पन्हं, थंड ग्रीन टी प्यावे. 

सनस्क्रीन आवश्यक लावा : त्वचेचा अनुरूप सनस्क्रीन शोधणे भलेही कठीण काम आहे. पण याचे फायदे आहेत. भारतीय त्वचेसाठी ३०-५० एसपीएफचे सनस्क्रीन उपयुक्त ठरतो. तेलगट त्वचेसाठी जेलयुक्त स्क्रीनदेखील उपलब्ध आहे. उन्हात जाण्यापूर्वी कमीत कमी २० मिनिट अगोदर त्वचेवर सनस्क्रीन अथवा लोशन वा जेल आवश्य लावले पाहिजे. 

नियमित व्यायाम करा : व्यायामाने शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि शरीराला आवश्यक ऑक्सिजनदेखील मिळतो. त्यामुळे त्वचाही निरोगी राहते. नियमित व्यायामाने त्वचेमध्ये नियमित हार्मोन्सचा संचार होतो. 

त्वचेला स्वच्छ आणि मॉश्चराइज करा : गुलाब जल, हरबरा पीठ आणि दही सारख्या प्राकृतिक व घरगुती वस्तूंच्या मदतीने त्वचा स्वच्छ करू शकता. त्यानंतर त्वचेला टोन आवश्यक करावे. यामुळे रोम छिद्र बंद होतात आणि त्वचेला गारवा मिळतो. जर मॉश्चराइज लावल्याने त्वचा तेलगट होते. ती उन्हात पाणीयुक्त मॉश्चराइजरचा उपयोग करू शकते.

एक्सफोलियशन आहे उपयोगी : दिवसभर चेहऱ्यावर अशुद्धता जमते. ती काढणे गरजेेचे आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा एक्सफोलिएशनचा वापर आवश्य करा. 

- डाॅ. करुणा मल्होत्रा, होम्योफिजीशियन, नवी दिल्ली
बातम्या आणखी आहेत...