आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधूच्या पेहरावातील नावीन्यासाठी लहंग्यावर घ्या दोन ओढण्या !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दीवा’नी या नव्या लेबलद्वारे आदित्य चोप्राने वडिलांच्या चित्रपटातील सौंदर्य पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे. ‘दीवा’नी हा एक चित्रपटनिर्मित झालेला ब्रँड आहे. परिणीता सलुजा आणि अंजली डोगराने बॉलीवूडची जादू ऑर्नेटच्या माध्यमातून सादर केली आहे. ज्या महिलांना जरी, गोटा पट्टी, सिक्वेन्स, नेट, काश्मिरी आणि गारा वर्कसारखे भारतीय पारंपरिक काम आवडते, अशाच महिलांसाठी हा ब्रँड आहे. परिणीता 15 वर्षांपासून डिझायनिंगच्या क्षेत्रात आहे. नववधूच्या पेहरावात नावीन्य आणण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यांनी वाराणसीच्या वीव्हजवरही अनेक प्रयोग केले आहेत. त्या सांगतात की, त्यांच्या कलेक्शनवर बॉलीवूडचा प्रभाव असला तरी ते केवळ चित्रपटांसाठी नव्हे. ‘चांदनी’ चित्रपटातील श्रीदेवीच्या पांढ-या साडीविषयी बोलताना त्या म्हणतात की, यश चोप्रांनी चित्रपटाला फ्रेश लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.
यश चोप्रांच्या चित्रपटात वापरण्यात आलेले स्कार्फ, ओढणी, कुर्त्यांची किंमत सात हजार रुपयांपासून सुरू होते. लहंगा, शरारा, जॅकेट, स्टिच्ड साडी आणि गाऊन पन्नास हजार रुपयांपासून सुरू होतात. भारतीय पारंपरिक जरदोजी वर्क असो किंवा हँडजरी, जामावार किंवा इतर कोणतेही वर्क त्यांना स्वत:च्या कामांतून पुन्हा जिवंत करायचे आहे. यामुळे वधूंना वैभवशाली भारतीय परंपरेविषयीची माहिती मिळेल तसेच या कला जाणून घेण्याची संधी मिळेल. यश चोप्रांच्या वाढदिवशी ज्या अभिनेत्रींनी रँप वॉक केला, त्या सर्वांना वेगवेगळे डिझाइन देण्यात आले होते. अनुष्का शर्माने व्हिक्टोरियन काळातील प्री-स्टिच्ड साडी नेसली. ती गाऊनसारखी ड्रेप केली होती. ही साडी ड्रेससारखीही घालता येते. ज्या महिलेला स्टाइलमध्ये राहायला आवडते, तिच्याकडे कळीदार सूट, आधुनिक पद्धतीचे ब्लाऊज, प्री-प्लीट साडी असायलाच पाहिजे. फ्लेयरच्या लहंग्यावर दोन ओढण्या शोभून दिसतात. त्यातील एक संपूर्ण ओढणीसारखी आणि एक चुन्नीसारखी घेता येते. यात फुशिया (गडद गुलाबी) रंग जास्त पसंत केला जात आहे. नववधूचा लहंगा उत्तम एम्ब्रॉयडरी आणि योग्य प्लेसमेंटनुसार सादर केला आहे.
पांढरा हा लग्नसमारंभाचा रंग मानला जात नाही. मात्र आता मुली पांढ-या वर्गातील आयव्हरी आणि बटर कलरची मागणी करत आहेत. तसेच बनारसी, कांजीवरमसुद्धा महिलांच्या पसंतीतील प्रकार आहेत. कारण हे डिझाइन तरुण मुलींच्या उद्देशानेच तयार केले आहेत. त्यामुळे त्यात मोठे डिझाइन, पॅटर्न तसेच भौमितीय डिझाइनचा वापर केला नाही.