आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी, अडवाणी आणि चर्चेची चावडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप, काँग्रेस, अडवाणी आणि मोदी यांची पुढील राजकीय खेळी काय असेल, हे वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी प्रश्नोत्तरे अशी असतील जणू चावडीवरील लोकांच्या गप्पा. एक जण मोदी विरोधक आणि काँग्रेसच्या बाजूने झुकलेला आहे. तर दुसरा भाजपचा समर्थक.

पहिला : अडवाणींनी राजीनामा देऊन मोदींचा अश्वमेधाचा घोडा रोखला आहे.
दुसरा : अडवाणी त्या घोड्याला बांधून ठेवू शकतील का? मला तर वाटते, मोदींच्या नियुक्तीला होकार दिला असता तर मोठे नेते म्हणून राहिले असते. राजीनाम्याचे राजकारण करून राहिलासाहिला मानही ते गमावून बसले. कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या नजरेतूनही उतरले.
पहिला : परंतु 50 वर्षांपासून अडवाणी राजकारणात आहेत. काही ना काही समर्थक असतील ना? आता ते मोदींसाठी काम करतील ? ..आणि जर पक्ष अशा त-हेने फुटला तर कोणीही उत्साहाने कसे काम करणार ? मी तर सांगेन, भाजपची जी ताकद आहे, त्यापैकी 20-30 टक्के कमी होईल.
दुसरा : असे बिलकुल नाही. जेव्हा नेतृत्व बदल होतो, विशेषत: राजकारणात तर निष्ठा बदलण्यास
वेळ लागत नाही. इतिहास पाहा - जे राजनारायण कधीकाळी चौधरी चरणसिंग यांना राम आणि स्वत:ला हनुमान म्हणवून घ्यायचे, तेच राजनारायण, त्याच चरणसिंग यांना ‘चेअर सिंग’ म्हणत त्यांच्यावर टीका करू लागले होते.
पहिला : ठीक आहे. सत्ता आणि नेतृत्वासोबत निष्ठा बदलतात, हे मान्य. परंतु मोदींच्या त्या स्वभावाचे काय, ज्यामुळे ते आपले विरोधक, ज्येष्ठांना मुळासकट नष्ट करतात. गुजरातमध्ये त्यांनी हेच केले. एकेका विरोधकाला संपवले. त्यांच्या या सवयीची भीती त्यांनाही असेल, जे त्यांच्यासोबत आहेत.
दुसरा : ठीक आहे. पण हाच स्वभाव इंदिरा गांधी यांचाही होता ना. त्यादेखील पक्षातील आपल्या विरोधकाला कायमच्या हटवत असत. त्यांना काँग्रेसमधून विरोधाला सामोरे जावे लागले होते. मोरारजी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना गूंगी गुडिया म्हटले होते. वेगळा पक्षही स्थापन केला होता. पण इंदिराजींनी राष्ट्रपती पदावर आपला उमेदवार उभा करून तो निवडून आणला होता.
पहिला : चला हेदेखील मान्य की ही अडचणही दूर होईल. परंतु संपूर्ण देश म्हणजे गुजरात आहे? तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणखीही व्यक्ती आहेत. मग ते सर्व देशाचे नेतृत्व करू शकतील ? देशात पक्षाला विजय मिळवून देतील ? मोदी असा चमत्कार करतील ?
दुसरा : ठीक आहे. इतर मुख्यमंत्रीदेखील आहेत. पण मोदींची गोष्टच वेगळी आहे. त्यांचे बोलणे, शैली देशातील तरुण, महिला आणि पन्नाशीतील लोकांना आवडणारे आहे. कार्यकर्त्यांनाही मोदींच्या भाषेत मजा वाटू लागली आहे. मोदी हाच एकमेव पर्याय आहे. सत्ता मिळेल न मिळेल, हे तर भविष्यातच कळेल. मात्र मोदींचे नाव जाहीर होताच काँग्रेस अडचणीत सापडली आहे हे नक्की.