आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युलिप किंवा युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी कशी निवडाल ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही विम्यामध्ये पैसे गुंतवा, असा सल्ला तुमचे काका, भाऊ किंवा मित्रांनी कधी दिला आहे का? करात बचत होईल आणि विम्याचे संरक्षण मिळेल, यासाठी गुंतवणूक आणि विमा याची सांगड घालण्याचा सल्ला कधी तुम्हाला कोणी दिला आहे काय? असे असेल तर तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी चांगली बाब आहे; पण हा योग्य मार्ग आहे का? हा दीर्घ मुदतीसाठी फायदेशीर ठरेल का? जर हेच एक रहस्य असेल तर आपण त्याची येथे उकल करूया.

सुमारे १० वर्षांपूर्वी नव्या विमा कंपन्यांनी मोठा गाजावाजा करून युलिप पॉलिसी बाजारात आणल्या. अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने युलिप पॉलिसी विकण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे यात गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण होते आहे काय? हे पाहण्याची सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या नियामक संस्थेची (विमा नियमन विकास प्राधिकरण) आयआरडीएची जबाबदारी होती. सर्वकाही ठीक चालले असताना अचानक ४ वर्षांत असे निदर्शनास आले की, जो पैसा गुंतवला होता, तो तर गायबच झाला आहे. म्हणजे या पैशात वाढ होईल, असे आश्वासन काही सल्लागारांनी दिले होते; परंतु त्यात वाढ तर सोडाच, ही रक्कम काढताही येणार नाही, अशी अवस्था झाली.

यात काही लॉकइन पीरियड होते. यामुळे मोठे बदल झाले. २००५ मध्ये आयआरडीएने मोठी पावले उचलली. २००९ मध्ये युलिपच्या नावावर फसवणूक करणारी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुंतवणूकदारांसाठी चांगला परतावा आणि चांगली वैशिष्ट्ये असणार्‍या योजना बाजारात येऊ लागल्या.

यासाठी, युलिप किंवा युनिट लिंक्ड विमा पॉलिसी घेण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्यायला हव्यात. कोणत्याही प्रकारचे नुकसान सोसावे लागू नये यासाठी काय केले पाहिजे आणि काय नाही? हे पाहणे जरुरी आहे. खाली काही मुद्दे दिले आहेत, त्यावर गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा.

तुम्हाला ठरावीक कालावधीनंतर किती रकमेची गरज आहे याची योजना आखणे गरजेचे आहे. जो परतावा मिळतो, त्याचा उल्लेख देण्यात आलेल्या प्लॅनच्या ब्राऊशर्समध्ये असला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या परीने याची माहिती मिळवू शकता. तोंडी आश्वासनावर भरवसा ठेवू नका. याच्याशी संबंधित ब्राऊशर्स तसेच लेखी स्टेटमेंट्सवरच भरवसा ठेवावा. यानंतरच एखादी गुंतवणूक करण्याबाबत विचार करावा. जर यात काही गडबड आहे किंवा काही संशयास्पद असल्याची शंकाही वाटली तर पूर्ण शहानिशा करूनच योग्य निर्णय घ्यावा.

तुम्हाला गुंतवणुकीवर किती शुल्क लागेल याची माहिती करून घ्यावी. यालाच प्रीमियम असे म्हणतात. त्याचबरोबर अनेक बाबी वजा होणार्‍या असतात. वजा रक्कम भरलेल्या प्रीमियममधूनच वळती केली जाते, याचा उल्लेख असेलही किंवा कळणारही नाही. प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊनच हातात पडणारी रक्कम पाहा. चार्जेस किंवा शुल्क म्हणून मॅनेजमेंट चार्ज, मोर्टलिटी चार्ज, अॅसेट अलोकेशन चार्ज लावण्यात येतात. या सर्व बाबींची माहिती जाणून घ्यावी. जर तुम्ही ठरवले तर कसलेही शुल्क न भरता फंड हस्तांतरित करू शकता. पॉलिसी चांगली नाही, असे वाटले तर तुम्ही ती बंदही करू शकता.

युलिपला कमी काळात फायदा देणारे इन्स्ट्रूमेंट समजू नये. याचा लगेच फायदा मिळतही नाही. यात दीर्घ मुदतीनंतरच फायदा मिळतो. १० वर्षांहून अधिक कालावधीतच फायदा मिळतो. जर त्यात कमी मुदतीत फायदा होत असेल तर समजून चाला, तुमचा एजंट बनवाबनवीच्या जाळ्यात अडकवतो आहे. युलिपला नेहमी विम्याच्या उद्देशानेच घ्यावे. ही गुंतवणूक समजू नका. यामुळे चार्जेसच्या नावाखाली वजा होणार्‍या रकमेपासून तुमची सुटका होईल. विमा नियमन विकास प्राधिकरणाने २०१३ पासून पारदर्शकता असण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत. पाच ते दहा वर्षांच्या पॉलिसीसाठी ४ ते ३ टक्के रक्कम मिळण्याची अट ठेवली आहे. ती तुम्ही अवश्य पाहिली पाहिजे. १० वर्षांच्या पॉलिसीवर जास्तीच्या प्राप्तीची वजावट पाचव्या वर्षापासून होते. अशा प्रकारे १० वर्षांहून जास्तीच्या पॉलिसीवर ही मर्यादा २.२५ टक्के असते.

निव्वळ परतावा - दरमहा मिळणार्‍या सकळ आणि निव्वळ प्राप्तीमधले अंतर जाणून घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला पॉलिसी बंद करायची असेल तर नवे सरेंडर चार्ज सहा हजार रुपये इतके लागतात. याचबरोबर आयआरडीएने सर्व प्रीमियमला युनिफॉर्म प्रीमियम बनवले आहे. आता कोणत्याही नव्या किंवा जास्तीच्या प्रीमियमला सिंगल प्रीमियमच मानले जाईल. पेन्शन किंवा अन्य वार्षिक पर्याय सोडून कमीत कमी विमा सवलती आवश्यक असतात. कमीत कमी विमा सुविधा वयानुसार दिली जाते.

यात विमा तर असतोच, पण युलिप म्हणजे गुंतवणूक ही समजूत खोटी ठरते. पेन्शनसारख्या योजनांवर कमीत कमी गॅरंटेड रिटर्न्स घेणार्‍यांच्या कमीत कमी हातात काय पडेल हे लक्षात येईल. सुरुवातीचे ५ प्रीमियम भरल्यानंतर जर एखादा चार्ज नियमित नसल्यास गुंतवणूकदारास रोख रकमेची गरज भासल्यावरच तो यातून बाहेर पडू शकतो. यासाठी कोणताही दंड लागत नाही. यात प्रीमियम सातत्याने नियमित न भरल्यास विमा कंपनी ग्राहकांना यातून बाहेर पडण्यासाठी स्टेटमेंट देते.

या विश्लेषणानंतर तुम्ही पॉलिसीत काय चांगले, काय वाईट हे ठरवू शकता. सर्व तपशिलाची नोंद ठेवा आणि एकदा भरणा चालू केल्यास त्यात सातत्य ठेवा.

तारेश भाटिया
सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर, फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य.