आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना शिस्तीने जगण्याची लावा सवय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतीच मी एक प्रेरक आणि रोचक गोष्ट वाचली. त्यात वडील आपल्या मुलाला विचारतात की, पतंग आकाशात स्थिर कोण ठेवते? मुलगा उत्तर देतो, हवा पतंगास आकाशात स्थिर ठेवते. वडील मुलाचे उत्तर नाकारतात. ते म्हणतात, दोरा पतंगास आकाशात स्थिर ठेवतो. पुन्हा मुलगा म्हणतो, दोरा पतंगास खाली आणतो. मुलाच्या उत्तरामुळे वडिलांच्या चेह-यावर हसू येते. ते म्हणतात, तू दोरा पकड म्हणजे तुला समजेल.
मुलगा वडिलांनी सांगितल्याप्रमाणे करतो. त्यामुळे पतंग काही वेळ उडतो आणि नंतर जमिनीवर येतो. त्यानंतर मुलगा पूर्ण दोरा गुंडाळत पतंगाच्या किना-यापर्यंत येतो. मग तो दोरा ताणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पतंग आकाशात जाऊ लागतो. पतंगास हवा लागताच तो उंच आकाशात जाऊन पोहोचतो. विपरीत हवा असताना आपल्याला आता फक्त दोरा सांभाळावा लागतो. जर विपरीत हवा असताना आम्ही पतंगास ढिल दिली तर पतंग आकाशात न जाता जमिनीवर येतो. म्हणजेच पतंग उडू शकत नाही.
वडिलांनी केलेल्या या प्रयोगामुळे मुलाला लवकर समजले की दोरा काय आहे आणि त्याचे नियम काय आहेत? स्वत:ला इतकीही ढील देऊ नका की जमिनीवर येऊ, हा धडा या गोष्टीतून मुलाला मिळाला. तसेच शिस्त आपल्या जीवनात किती महत्त्वपूर्ण आहे आणि शिस्तीने जीवन जगल्यामुळे आपली कामे कशी सोपी होतात, त्यामुळे आपण आपले निश्चित केलेले ध्येय गाठू शकतो हेही यातून कळाले.
आई-वडील म्हणून आपली जबाबदारी असते की, आपण आपल्या मुलांना शिक्षित तर करावेच, सोबत शिस्तीत जगण्याचे धडेही द्यावेत. अनेक वेळा माझ्या व्याख्यानात आई-वडिलांकडून प्रश्न येतो की, मुलांना प्रेरित कसे करावे? मी त्यांना एकच सांगतो दृष्टी आणि उत्साह मिळून प्रेरणा मिळते. दृष्टीच्या माध्यमातून विचार केल्यास आई-वडिलांनी आपल्या मुलाला वेळ द्यावा आणि मुलाचा दृष्टिकोन स्पष्ट करावा. त्यामुळे मुलांमध्ये उत्साह कायम राहील.
उत्साहामुळे तीन गोष्टी येतात. पहिली लक्ष्मी म्हणजे अशी साधनसामग्री, ज्यामुळे मुलाचे जीवन सुकर होेईल. दुसरे सरस्वती, त्याला रामायण, महाभारतासारखे महान ग्रंथ वाचण्यास द्या. व्यक्तींचे जीवन चरित्र वाचू द्या. त्यामुळे त्यास आपले चरित्र बनवण्यास मदत मिळेल. तिसरे दुर्गा म्हणजे शक्ती. हे लक्षात ठेवा की मुलगा यामुळे
पुरेशी झोप आणि आहार घेईल. त्याच्या आहारातही पुरेशी ऊर्जा असावी. या तीन गोष्टी केल्यास मुलांचे संगोपन आपण चांगल्या पद्धतीने करीत असल्याचे निश्चित होते.