आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक विचारांचे संस्कार करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेतून घरी परतल्यावर आपला मुलगा नाराज दिसला तर आपण ‘काय झाले?’ असे विचारतो. एखादा पेपर अवघड गेल्याचे कळले तर ‘ठीक आहे’ असे आपण म्हणतो. अशाच प्रकारे टीव्हीवर क्रिकेट
सामना सुरू असताना अचानक लाइट गेली तर तोसुद्धा दुर्भाग्य असल्याचे समजून घेतो.
या गोष्टी आशा आणि निराशावादाच्या आधारे समजून घेता येतील. मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिगमॅन यांच्या एका पुस्तकात वरील उल्लेख आहे.


स्थितप्रज्ञ : एखादी नकारात्मक घटना घडल्यास किंवा एखादी चुकीची गोष्ट घडल्यास निराशावादी व्यक्ती आशा सोडून देण्याच्या गोष्टी करतो. याउलट आशावादी व्यक्ती ही परिस्थिती आव्हान म्हणून स्वीकारते.


व्यापकता : एखादा पेपर अवघड गेल्यास संपूर्ण निकालावर परिणाम होईल, असे निराशावादी व्यक्तीचे विचार असतात. पण गणिताचा पेपर अवघड गेला असेल तर इतर विषयांत तरी चांगले गुण मिळतील, असा विचार आशावादी व्यक्ती करते.


परिस्थिती समजून घेणे : वैयक्तिकरीत्या एखाद्या गोष्टीत सहभागी होणे, असा याचा अर्थ आहे. चुकीचे घडल्यास निराशावादी व्यक्ती स्वत:ला दोष देते, तर आशावादी व्यक्ती त्यावर उपाय शोधते.


आशावादी असण्याचे महत्त्व : सकारात्मक विचार असतील तर व्यक्ती कणखर बनते. त्यामुळे तणाव कमी होईल. यश आणि समाधान मिळेल. हितसंबंध सुधारतील. दररोज एखाद्या गोष्टीची स्तुती करा. अपयश आल्यानंतर पुन्हा एखादी नवी गोष्ट करण्यास घाबरू नका. मुलाला सकारात्मक करण्यासाठी हीच युक्ती वापरा. वेळ येईल तेव्हा या टप्प्यांविषयी त्याला समजवून सांगा.


कठीण समयी : मुलाचे म्हणणे ऐका आणि नेमकी समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो समाधानी असल्यासच पुढील निर्णय घ्यावेत.


विश्वास : स्वत:वरील विश्वास कायम ठेवा. त्यामुळे मुलाच्या संगोपनातही चांगले परिणाम मिळतील. स्वत:वर विश्वास नसल्यास मी चांगला असलो तरी कुणालाही मी आवडत नाही, अशी भावना वाढीस लागते. मोठेपणी याचे दुष्परिणाम दिसून येतात.


संपूर्ण ताकद पणाला लावा: मुलावर सकारात्मकतेचे परिणाम करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावा. कारण तुमचे निरीक्षण करूनच तुमचे पाल्य आयुष्यातील महत्त्वाचे धडे घेत असतो.
- प्रिव्हेन्शन मॅगझीन