आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघभावना समजू शकणाराच चांगला लीडर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर चर्चा टाळू नका. जे काही होतेय ते समजून घेणे आवश्यक आहे. टीमसमोर बोलताना ‘स्वत्वा’चा वापर योग्य पद्धतीने व्हावा. यासंदर्भातील टिप्स वाचा हॉर्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून...

गुंतागुंतीच्या विषयावर मोकळेपणाने मत मांडण्यास प्रोत्साहन द्या.
जे वास्तवाला भिडत नाहीत त्या लीडर्सवर टीका करणे सोपे असते. सामान्यपणे बहुतांश लोक वास्तव न समजता त्याचा इन्कार करतात. कठीण मुद्दे चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जटिल मुद्दे ज्या वेळी चर्चेसाठी येतात तेव्हा त्यांना प्रोत्साहन द्या. टीममध्ये विविध पैलूंवर जेव्हा विचार होईल त्या वेळी नकाराची परिस्थिती उद्भवणार नाही. अशात विविध टीम्स पूर्वानुमानाला आव्हान देतील आणि जे काही होत आहे त्याचे चांगले चित्र समोर ठेवतील. आपण ज्या पद्धतीने जगाकडे पाहत आहोत त्याच पद्धतीने अन्य लोकही पाहत असतील असा विचार करण्याचा प्रयत्न करू नका. वास्तव आणि आकडे विश्लेषणासाठी खुले असतात. या गोष्टी समजण्यासाठी लोकांकडे आपापले निकष असतात.
(स्रोत : द डेंजर्स ऑफ डिनायल-रॉन एश्केनास)

लीडर्सनी फोन आणि मेल्स मर्यादितच वापरावेत
काही यशस्वी एक्झिक्युटिव्हज जाणूनबुजून फोन आणि ई-मेलचा मर्यादित वापर करतात. फोनवरून टीमला सांभाळणे सोपे नाही. असे असले तरी फोन सामान्य माहिती देणे आणि विचारपूर्वक पद्धतीने म्हणणे ऐकण्याचे चांगले माध्यम आहे, मात्र ते आव्हानात्मकही आहे. विचारांचे आदान-प्रदान आणि विश्लेषण करायचे असेल तर व्यक्तीशी थेट बोलणे महत्त्वपूर्ण राहील. फोन आणि ई-मेलच्या जास्त वापरामुळे टीम कुठले काम करण्यास कां-कू करू शकते? टीममधील दुबळे सदस्य आपल्या उत्तरावर अवलंबून राहतील.
(स्रोत : मॅनेज युवर वर्क, मॅनेज युवर लाइफ- बी, ग्रॉयबर्ग)

लीडर्सनी असा करावा ‘मी’ आणि ‘आपण’चा वापर
लीडर्स टीमला समजून घेत असतील तर जनसंवादातून करिअर घडवण्यात त्यांना मदत मिळू शकते. या गोष्टी त्यांच्यासाठीच आहेत असे समजत काही मोठे लीडर्स जनसंपर्क समजण्यात चूक करतात. मात्र, संवाद आमच्याशी व्हायला हवा, असे ऑडिएन्स किंवा टीमला वाटते. लीडर्स संवाद साधताना ‘स्वत्वा’चा जास्त वापर करत असतील तर टीमला ते कमी आवडते. ‘आपण’चा जास्त वापर असायला हवा. जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ येते तेव्हा टीमला वाटते, लीडर्सनी म्हणावे, मी आहे, मी करेन. त्यामुळे आपण आणि ‘मी’चा वापर केव्हा करावा हे ओळखले पाहिजे. ज्या वेळी सकारात्मक यशाची वेळ येते तेव्हा आपणचा वापर करावा. ज्या वेळी कोणत्या चुकीची जबाबदारी घ्यावयाची असेल तर ‘मी’चा वापर करावा. आपल्या टीमचे सदस्य यातील अंतर समजतात.
(स्रोत : एव्हरी लीडर्स रिअल ऑडियन्स-रोजाबेथ मॉस केंटर)

सुपरमॅन व्हिडिओ गेम उदार बनवतो
जे लोक कॉम्प्युटर गेम खेळताना सुपरमॅनचा वापर करतात ते दुसर्‍या व्यक्तींच्या तुलनेत जास्त उदार असतात हे एका पाहणीत दिसून आले आहे. जे सैतान वोल्डेमोरचा अधिक वापर करतात त्यांच्यापेक्षाही हे लोक अधिक दयाळू असतात. युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉइसच्या गुनवू यून आणि पॅट्रिक टी वर्गास यांनी आपल्या अभ्यासात हा निष्कर्ष काढला आहे.
(स्रोत : सायकॉलॉजिकल सायन्स)

... तर सरासरी दर्जाच्या कल्पना येतात
संशोधनाला चालना देण्यासाठी कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या इक्विटी शेअर्स आणि अन्य आकर्षक फायद्यांतून नवनव्या कल्पना खूप येतात, मात्र त्या सरासरी दर्जाच्या असतात. यामुळे मूळ उद्देश पूर्ण होत नाही. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्कच्या ओलिवर बोमॅन आणि जर्मनीतील फ्रॅँकफर्ट स्कूल ऑफ फायनान्स अ‍ॅँड मॅनेजमेंटच्या नील्स स्टिग्लिट्जच्या म्हणण्यानुसार, कंपन्यांनी नवनिर्मितीसाठी लो-पावर्ड इन्सेंटिव्ज दिले पाहिजे.
(स्रोत : सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क)

इंटरनेटच्या अधिक वापरामुळे नैराश्य
इंटरनेटचा कमी वापर करणार्‍यांच्या तुलनेत त्याचा जास्त वापर करणारी अल्पवयीन मुले नैराश्यात येण्याचा धोका 2.5 पट जास्त असतो. ऑस्ट्रेलियाज स्कूल ऑफ मेडिसिन, सिडनीच्या लॉरेन्स टी. लेमच्या अभ्यासामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इंटरनेटचा अधिक वापर केल्यामुळे व्यक्तीमध्ये आक्रमकता वाढते, नात्यात समस्या, आरोग्यावर परिणाम होतात आणि अन्य मानसिक समस्या निर्माण होते, असे त्यांचे म्हणणे आहे.
(स्रोत : ब्लमबर्ग बिझनेस वीक)