आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोत्कृष्ट कौशल्याचे मूल्यही चुकवावे लागेल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वोत्कृष्ट व कुशल माणसे मिळवण्यासाठी विपणन तंत्राचा योग्य वापर करता येतो. उत्पादन विक्रीसाठी ग्राहकांना प्रोत्साहित करण्याशिवाय विपणन कौशल्य येथेही वापरता येते. टीमवर्कसाठी श्रमविभाजन आवश्यक आहे. जबाबदारी देण्यापुरतेच श्रमविभाजनाचे कार्य नाही, तर त्याचे परिणाम वारंवार तपासले पाहिजेत.

कुशल माणसांच्या निवडीत विपणन तंत्राचा वापर
विपणन कंपन्यांनी नव्या नियुक्त्यांची जबाबदारी केवळ एचआर विभागाला सोपवणे चुकीचे आहे. विपणन कौशल्य नव्या माणसांची निवड करतानाही वापरता येते. कौशल्यांना तारणे व टिकवून ठेवणे हे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासारखेच तंत्र आहे. सर्वोत्कृष्ट व्यक्तीच्या निवडीसाठी विपणन पद्धती महत्त्वाच्या ठरतात. मात्र, त्यासाठी तुमच्या प्राथमिकता निश्चित असणे गरजेचे आहे. चांगली माणसे तेव्हाच मिळतात, जेव्हा ऑफर्स चांगल्या दिल्या जातात. ग्राहकांना उत्पादनांची योग्यता सांगून त्यांना आकर्षित करावे लागते. तसेच तंत्र चांगल्या, कुशल व्यक्तींना कंपनीची वैशिष्ट्ये सांगून स्वत: सोबत जोडून घेण्यासाठी वापरावे लागते.
(स्त्रोत: स्ट्रटेजीज् टू अ‍ॅट्रॅक्ट सुपरपॉवर मार्केटिंग टॅलेंट, कारा फ्रान्स आणि मार्क बोंशेक)

प्रयोगशीलतेवर अति भर दिल्यास नुकसान
टीमवर्कमध्ये एखाद्या टप्प्यावर साचलेपण येणे स्वाभाविक आहे. काही कालावधी निघून गेल्यावर असे होते. मात्र, सातत्याने बैठका घेणे व टीमवर दबाव टाकणे, हा यावरचा उपाय नाही. त्यापेक्षा समस्येच्या कारणाचा शोध घ्या. टीमला त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीविषयी आठवण करवून द्या. शक्य असेल तर जुनी टीम पुन्हा गठित करा. अनेकदा टीमचे सदस्य स्वत:चे विचार व्यक्त करायला कचरतात. या वातावरणात बदल करा. त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहित करा. प्रयोगशीलतेवर अति लक्ष दिल्यास होणारे कामही बिघडू शकते. त्यामुळे त्याचीही सीमा ठरवून घ्या. (स्त्रोत: व्हॉट टू डू इफ योर टीम इज इन अ रट, रेबेका नाइट )

जबाबदारी सोपवताना कामगिरीचे मूल्यमापन
नव्या कामाची जबाबदारी एखाद्या सदस्यावर सोपवताना त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे स्पष्ट करा. प्रत्येक कामाचा वेळ निर्धारित करा. त्याविषयी संबंधित सदस्यांशी चर्चा करा. त्याला वेळेच्या मर्यादेची व भविष्यात निर्माण होणार्‍या परिस्थितीची जाणीव करून द्या. तुमचा सल्ला त्याने केव्हा घ्यावा हेदेखील सांगा. त्याच्या कामाचे मूल्यमापन कोणत्या आधारांवर केले जाणार आहे याची निश्चिती सुरुवातीलाच करा. कोणतीही अस्पष्टता न ठेवता जबाबदारी सोपवा. फीडबॅक प्रक्रिया व रिव्ह्यूचा फॉरमॅटही आधीच ठरवून घेणे गरजेचे आहे. टीमप्रमुख व सदस्यांमध्ये पारदर्शकता असेल तर परिणाम चांगला मिळतो.
(स्रोत : डेलीगेटिंग वर्क, २० मिनिट मॅनेजर सिरीज)

सातत्याने काम करत असाल तर ब्रेक घ्या
डेस्कवर सातत्याने काम करताना अनेकांना ब्रेक घेण्याची गरज वाटत नाही, त्यामुळे काम मंदावेल, असे भय त्यांना वाटते. मात्र सतत काम केल्याने मेंदूला थकवा येतो. त्यामुळे कामात चुका होतात. आपल्याला अनेकदा त्याची जाणीव होत नाही. दररोज कामाच्या तासांमध्ये थोडासा ब्रेक आवश्यक आहे. हे ब्रेक १५-१५ मिनिटांचे असावे. या वेळात तुम्ही संगणकासमोर बसू नका. हा वेळ सोशल संकेतस्थळांवरही घालवू नका. मेंदूला तजेला व विश्रांती मिळेल असे काही या ब्रेकमध्ये करा.
(स्रोत: शेड्यूल अ १५ मिनिट ब्रेक बिफोर यू बर्न आऊट, रॉन फ्रीडमॅन )