आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामात टीमची रुची वाढवण्याच्या पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीमला जास्तीत जास्त वेळ कामात सहभागी करून घेण्यासाठी काही उपाय व तंत्र सांगितले आहेत. तसेच फीडबॅकचा चांगला परिणाम साधता यावा, यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबी सांगण्यात आल्या आहेत. यासंबंधी काही टिप्स...

1 नव्या कल्पना नाकारण्यापेक्षा दुरुस्ती सुचवा
वि विध रुचींच्या लोकांना स्वत:सोबत कनेक्टेड ठेवणे कौशल्याचे काम आहे. ग्लोबल टीमसोबत काम करत असाल तर सतत सर्व टीम सदस्यांना संवादी कसे ठेवायचे, हे जाणून घ्या.
- ई-मेलला प्राधान्य द्या. तत्काळ पाठवले जाणारे मेसेज क्षणार्धात पोहोचतात. मात्र, विविध टाइम झोनप्रमाणे मेसेज पाठवण्याचे वेळापत्रक करून घ्या. त्याप्रमाणे मेसेज वर्गीकृत करून डिलेव्हरी सेटिंग करा.
- सकारात्मक राहा.मिळून मिसळून राहायला शिका. ई-मेलमध्ये इमोशिकॉनचा वापर करा.
- सूचना द्या. टीका करू नका. ‘मला तुमची कल्पना कळली नाही’ अशी वक्तव्ये टाळा. कोणाचीही कल्पना सरसकट रद्द ठरवू नका.

2 टीमला सातत्याने कनेक्टेड ठेवण्यासाठी ४ स्टेप्स
ध्ये य साध्य करायचे असेल तर कंपनीतील प्रत्येकाचा विश्वास संवादावर असला पाहिजे. यासाठी चार महत्त्वाच्या स्टेप्स. पहिली, एक सर्व्हे करून संवादाचा स्तर शोधा. माहिती नसलेल्या बाबींचे व्यवस्थापन करता येत नाही. दुसरी स्टेप म्हणजे कार्यशाळा. कार्यशाळा व कोचिंगच्या माध्यमातून व्यवस्थापकांना संवादी राहण्याचे प्रशिक्षण द्या. तिसरी, लीडर्सची निवड करा. संवादी राहून जो कर्मचारी इतरांवर प्रभाव टाकण्यास सक्षम आहे. संवादाची क्षमता वाढवण्यासाठी लीडर्सच्या भूमिकेचा रिव्ह्यू घ्या. संवादी राहण्यात अग्रेसर असणार्‍यांना प्रोत्साहन, पुरस्कार द्या. जे लीडर्स तयार झाले आहेत, त्यांच्या क्षमतांना गांभीर्याने घ्या. - सोर्स: व्हॉट मेक्स समवन एन एंगेजिंग लीडर

3 फीडबॅकचा प्रभाव सिद्ध करणार्‍या बाबी
फीडबॅक हा कामाचाच भाग आहे. कामाची पद्धत वेगळी असेल तर त्याला अचूक फीडबॅक देणे शक्य नसते. फीडबॅकमधून तुम्हाला काय साध्य करायचे आहे, हे निश्चित असू द्या. काही परिस्थितींमध्ये फीडबॅक न देणे उत्तम-
- तुम्हाला संपूर्ण माहिती नसल्यास.
- दुसरी व्यक्ती योग्य प्रतिक्रिया देणार नाही, याची जाणीव असताना.
- समोरचा जास्त भावुक वा कमकुवत असल्यास.
- तुमच्याकडे त्याला समजावण्यास वेळ नसल्यास.
- हे व्यक्तिगत रुचीवर आधारित असल्यास आणि त्याचा संबंध कामाचा दर्जा वाढवण्याशी असेल तर.
- तुमच्याकडे ठोस उत्तर नसेल तर.