आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दूरसंचार क्रांतीचा सूर्य अस्ताकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एका दशकात मोबाइलधारकांची संख्या 65 लाखांवरून 90 कोटींपर्यंत पोहोचली. प्रतिस्पर्धा, स्वस्त कॉल दर आणि प्रमोशनल ऑफर्सनी विकासाचे इंजिन म्हणून काम केले. पण आता परिस्थिती बदलली आहे. दूरसंचार क्षेत्राची स्थिती बिकट झाली आहे.


कॉल दर महागले : विदेशी कंपन्यांनी भारतात पैसा गुंतवला, तेव्हा कॉल दर ‘दोन सेकंदांना एक पैसा’ एवढे कमी झाले होते. पण आता दिवसेंदिवस कॉल दर महाग होत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलायन्स कम्युनिकेशनने
प्रीप्रेड ग्राहकांसाठी 25 टक्के दरवाढ केली. मोफत टॉकटाइमही बंद केला.


गेल्या महिन्यात भारतातील
सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने कॉल दरांमध्ये 100 टक्के वाढ केली. व्होडाफोन आणि आयडियानेही अशी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांनी प्रमोशनल ऑफर्स आधीच कमी केल्या आहेत.


स्पर्धा संपुष्टात : सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशानंतर राज्यांमधील परस्पर स्पर्धा संपणार आहे. टाटा टेली सर्व्हिसेस, युनिनॉर आणि व्हिडिओकॉन कंपन्यांनी ज्या राज्यात स्पेक्ट्रम घेतले नाहीत, त्या राज्यांमधील सेवा बंद होऊ शकते. कंपन्यांमध्ये ग्राहक वाढवण्याची स्पर्धाही पूर्वीप्रमाणे दिसत नाही. सेल्युलर
ऑपरेटर असोसिएशननुसार डिसेंबर 2012 मध्ये मोबाइलधारकांची संख्या नोव्हेंबरच्या तुलनेत एक टक्का कमी झाली. कॉल दर वाढण्याची मालिका सुरूच राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.


अद्यापही अडचणी कायम : स्पेक्ट्रम शुल्क म्हणून भारतीला 5,201 कोटी, आयडियाला 2,113 कोटी आणि रिलायन्सला 173 कोटी रुपये सरकारकडे भरायचे आहेत. याचा ताण ग्राहकांच्या खिशावर पडणार हे स्पष्ट आहे. नव्या भागांतील सेवा विस्तारावर परिणाम होऊ शकेल. स्पेक्ट्रमच्या पुढील टप्प्यात होणा-या लिलावाकडूनही फार अपेक्षा नाहीत. सीडीएमए आणि जीएसएम दोन्ही प्रकारच्या कंपन्या मूळ दर कमी करण्यासाठी दबाव आणत आहेत.