आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अब्जावधींच्या घेवाणदेवाणीशी निगडित समुद्री केबल असुरक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटलांटिक महासागरातील पहिली टेलीग्राफ केबल आयर्लंडमध्ये टेलिग्राफ फील्ड आणि न्यूफाउंडलँडमध्ये हार्ट्स कंटेटच्या दरम्यान एका जहाजाच्या डेकवर लावली होती. ती लावायला चार वर्षे लागली. १८५८ मध्ये तुटण्याआधी तिने तीन आठवडे काम केले. आज समुद्रात ३१२ केबल आहेत. ही सारे केसासारख्या पातळ ग्लास फायबरच्या जवळपास लपेटलेली आहे. जगातील ९९ टक्के आंतरमहाद्विपीय डेटा ती घेऊन जाते. त्यात अब्जावधी रुपयांचा व्यवहार आहे. प्रत्येक तिसऱ्या दिवशी एका केबलची पुनर्रतपासणी होते.

सामान्यपणे मासेमार जहाज वा लंगर केबलचे नुकसान करतात. मात्र २०१५ मध्ये अमेरिकन सुरक्षा विभाग पेंटागनला आढळले की रशियन पाणपुड्या आणि पाण्यात काम करणारी उपकरणांनी भरलेले एक जहाज केबलच्या आसपास प्रवास करत होते. समुद्र तटाजवळ केबल लाइन्स सुरुंगांच्या आत दबलेल्या असतात.मात्र खोल समुद्रात त्या नजरेस पडतात. त्यांची जाडी बागेतील पाइपइतकी मोठी असते. नव्या मार्गाच्या सर्वेक्षणाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांना जुन्याच केबल लाइनजवळ पसरण्यात आले.

शीतयुद्धादरम्यान अमेरका सेव्हियत सैन्याच्या केबल लाइनवर बारीक लक्ष ठेवी. प्रत्येक महिन्यात पाणबुड्यांना समुद्रात धाडले जाई. फायबर ऑप्टिक केबलमधून संदेश नेणाऱ्या प्रकाशाचा मार्ग बदलण्यासाठी प्रिज्मचा उपयोग केला जात असावा. मात्र एडवर्ड स्नोडेनने सांगितले की, अमेरिकेला चिंता करण्याची गरज नाही. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचा वावर अमेरिकेतून जाणाऱ्या प्रत्येक डेटावर असतेच असते.
ही परिस्थिती लवकरच बदलू शकते. ग्लोबल वार्मिंगमुळे अंटार्टिक समुद्रातील बर्फ वितळल्यामुळे उत्तर पश्चिमेचा रस्ता आशियातून युरोपात केबल टाकणाऱ्या जहाजांसाठी उघडला आहे. भविष्यात केबल लाइन्स अमेरिकेच्या नजरेसमोरूनच जातील. मात्र केबल लाइन्सला इतरही अनेक धोके आहेत. २०१२ मध्ये हार्वर्डच्या एका अभ्यासात इशारा देण्यात आला आहे की, समुद्र तटाजवळील केबल टर्मिनल हॅकर्स वा विदेशी तस्करांचा निशाणा बनू शकतात. केबलची सुरक्षा अणुप्रकल्पाच्या धर्तीवरच व्हावी लागेल.

२०१७ मध्ये अंटार्किकच्या खोलवर इंटरनेट पोहोचू शकते कारण ग्लोबल वार्मिंगमुळे आधी बर्फच्छादित्य पाण्यात आता केबल टाकली जात आहे.
केबललाइन्स आणि आकडे
६७० खर्व रुपयांचा प्रतिदिन देवाणघेवाणीचा व्यवहार समुद्री केबलद्वारे
१० डॉलर प्रतिशब्दाच्या हिशेबानुसार 1866 मध्ये पहिल्या ट्रान्सअटलांटिक केबलद्वारे टेलिग्राफ पाठवण्यात आला.
७०% हानी होते, लंगर टाकल्यामुळे आणि मासेमार जहाजांमुळे. दरवर्षी 100 हून जास्त केबल तुटतात.
९९% अांतर महाद्विपीय डेटा समुद्री केबलद्वारे ट्रान्सफर होतो. उपग्रहातून डेटा पोहोचायला जास्त वेळ लागतो.
२५ वर्षे सरासरी चालू शकते समुद्री केबल. मात्र याला कोणतीही हानी पोहोचायला नको.
बातम्या आणखी आहेत...