गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाण्याची दाट शक्यता असून संरक्षण मंत्रालयासारखे महत्त्वाचे मंत्रालय दिले जाणार असल्याचे समजते. याची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी यासंदर्भात पर्रिकर यांनीही अनुकूल संकेत दिले आहेत. असे झाले तर पर्रिकर तिसरे मराठी संरक्षणमंत्री असतील. यापूर्वी शरद पवार यांनी हे पद भूषविले होते. पण पर्रिकर यांचा केंद्रीय पातळीवर एवढा वावर नसतानाही त्यांच्या नावाचा विचार कसा काय करण्यात आला हा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. त्यामुळे जाणून घेऊयात त्यांच्या निवडीमागे असलेली ठळक 10 कारणे...
मनोहर पर्रिकर यांचे पूर्ण नाव मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रिकर असे आहे. त्यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी गोव्यातील म्हापसा येथे झाला. 2000 ते 2005 या कालावधीत ते प्रथम गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून निवडून गेले. त्यानंतर मार्च 2012 पासून ते गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. पणजी मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करतात.
मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या पर्रिकरांनी आयआयटी मुंबईमधून मेटर्लरी इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे. आयआयटी पदवी असलेले ते भारतातील पहिले मुख्यमंत्री आहेत. 2001 मध्ये त्यांना आयआयटी मुंबईने गौरविले होते. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन नंदन निलेकणी आणि पर्रिकर आयआयटीचे सहविद्यार्थी होते.
पुढील स्लाईडवर वाचा, मनोहर पर्रिकर यांची निवड होण्यामागील 10 प्रमुख कारणे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का केली पर्रिकर यांची निवड... जाणून घ्या पडद्यामागच्या बाबी...