आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देण्याचे सुख: दान देण्याचे सूत्र आणि रसायनशास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देण्याचे सुख
२-८ ऑक्टोबर, २०१४

कुणी कुणाला एखादी गोष्ट दिल्यानंतर घेणा-याला काही त्रास झाला, अथवा नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही. यातूनच देण्याचे सुख मिळते. गेल्या सहा दिवसात आपण काही दान केले असेल किंवा त्याचा संकल्प सोडला असेल. आज जॉय ऑफ गिव्हिंग आठवडा संपत आला आहे. दान केले नसेल तर आज किंवा उद्या ते करू शकता, कारण देण्यासाठी कोणती संधी शोधण्याची आवश्यकता नाही. चला इतरांच्या चेह-यावरील हसू फुलवत आपला आनंद द्विगुणित करू या...
दान देण्याचे सूत्र आणि रसायनशास्त्र

विज्ञान
डोपामाईन नव्हे, ऑक्सिटोसिन वाढवा
आठव्या शतकात नालंदा विद्यापीठातील तत्त्वज्ञ शांतिदेव म्हणाले होते, ‘या जगात जो आनंद आहे तो इतरांना मिळावा म्हणून केलेल्या प्रयत्नांतून तो आला आहे. उलट जगात जे दु:ख आहे ते स्वत:ला सुख मिळवण्याच्या लालसेतून आले आहे.’ या विचारांची प्रचिती आधुनिक युगातही येत आहे. ‘क्युपिड्स पॉइझन्ड एरो’ या मॉर्निया रॉबिन्सन यांच्या पुस्तकांतील विचारांनुसार, स्वत:च्या आनंदासाठी जेव्हा आपण काही करतो तेव्हा डोपामाइन हार्मोन जागृत होतो. मात्र, यातून आनंद मिळत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते. माणूस नैराश्याकडे झुकतो.
डोपामाइनला संतुलित करणारे दुसरे हार्मोन आहे ऑक्सिटोसिन. तणाव दूर करून हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. इतरांवर नि:स्वार्थ प्रेम, दया, उपकार यातून हा निर्माण होतो. यामुळे सकारात्मक प्रवृत्ती निर्माण होते.
* विश्लेषण व अभ्यासाअंती निघाला एकमेव निष्कर्ष
या अपूर्व आनंदाचे अर्थशास्त्रच व्यस्त
जॉन रॉकफेलर अमेरिकेतील मोठे उद्योगपती व दानशूर व्यक्ती होते. आपल्या दातृत्वाबद्दल ते म्हणत, मी एवढा पैसा कमावला, कारण लोकांना मदत करण्याची माझ्यात ऊर्मी होती. लोकांना दिले, त्यामुळे मला मिळाले. मी दान केले नाही तर ईश्वर माझ्याकडून पैसे परत घेईल.
अर्थतज्ज्ञ जॉन सी. ब्रुक्स यांनी १९०५ मध्ये रॉकफेलर यांचे वरील वाक्य वाचले तेव्हा पैसे वाटून कोणी पैसे कसे कमावेल? असे वाटले. हे काय अर्थशास्त्र नाही. त्यांनी रॉकफेलर यांचे तत्त्व खोडून काढण्याचे ठरवले. हार्वर्ड विद्यापीठांतील संशोधकांनी अमेरिकेतील ४१ समुदायाच्या ३० हजार लोकांच्या सेवाभाव व दान देण्याच्या प्रवृत्तीचा अभ्यास करण्याचे जाहीर केले. ब्रुक्स यांनी संशोधन अहवालाचा अभ्यास केला,तेव्हा दान करण्याच्या प्रवृत्तीचे लोकच श्रीमंत होत असल्याचे लक्षात आले. एवढेच नव्हे त्यांना विरोधाभासही दिसून आला. दोन समान कुटुंब, धर्म एक, मुलांची संख्या सारखी, शिक्षणाचा स्तरही सारखाच. मात्र, जे कुटुंब १०० डॉलर जास्त दान देत होते ते सरासरी ३७५ डॉलर जास्त कमावत होते, हे दिसून आले. ते चक्रावून गेले. नवी माहिती संकलित करून संगणकावर नव्या सॉफ्टवेअरचा वापर केला, पण निष्कर्षात फरक पडला नाही. यानंतर त्यांनी रक्तदात्यांची माहिती जमवली. रक्तदानाने तर कोणी श्रीमंत होत नाही? मात्र, रक्तदानातून लोक श्रीमंत होत होते हे वास्तव होते. त्यांनी अमेरिकेतील ५० वर्षांचे उत्पन्न आिण बदलाचा अभ्यास केला. १९५४ ते २००४ दरम्यान अमेरिकींची खरेदी क्षमता १५० टक्क्यांनी तर दान करण्याची क्षमता १९० टक्क्यांनी वाढली. याचा अर्थ पैसा आल्यानंतर लोक उदार झाले. अमेरिकेत दानाची रक्कम १ टक्क्याने वाढल्यानंतर बाजारात १ अब्ज डॉलर येतात. यामुळे नवे ३९ अब्ज डॉलर बाजारात येतात.दानामुळे गुंतवणूक नव्हे तर देशभक्ती होते. नोक-या वाढतात. कराच्या रूपातून येणारे उत्पन्न वाढते. अमेरिकी लोक फ्रान्सच्या लोकांच्या तुलनेत साडेतीन पट, जर्मनीच्या ७ पट आिण इटालीयन लोकांच्या तुलनेत १४ पट जास्त दान करतात. यातून संभ्रम झाल्याने बुक्स आपल्या मानसोपचार तज्ज्ञ मित्राकडे गेले तेव्हा ते म्हणाले, तुम्ही अर्थतज्ज्ञ केवळ पैसा पाहता हे आम्ही पाहत आलो. पैशातून सुख मिळते. आनंदी व्यक्ती जास्त उत्पादनक्षम असतो. त्यामुळे तो जास्त काम करतो. दानातून आनंद आणि आनंदातून यश मिळते.
* कथा
जॉय ऑफ गिव्हिंग या जगात अनमोल
एक महिला डोंगर-द-यांत फिरत असताना तिला नदीमध्ये एक माणिक सापडला. दुस-या दिवशी तिला असाच एक फिरस्ता भेटला. तो भुकेला होता. महिलेने त्याला खाण्यासाठी काही द्यावे म्हणून बॅग उघडली. त्याला माणिक दिसला. ‘मला हा माणिक देशील?’, माणसाने तिला विचारले. ितने काहीही विचार न करता माणिक देऊन टाकला. नशिबावर खुश होऊन तो माणूस परतला. त्याला यामुळे जीवनभर पुरेल एवढा पैसा मिळणार होता. मात्र काही दिवसांनी तो महिलेस शोधत परत आला. माणिक परत करून तो म्हणाला, ‘हा माणिक बहुमोल आहे हे मी जाणतो. तरीही मी तो या आशेने परत करत आहे की हा माणिक मिळावा इतकी पात्रता तुला ज्यामुळे मिळाली ती मला तू देशील...तुझ्यात असे काय आहे?’ त्या महिलेनेही तत्काळ उत्तर दिले... ‘जॉय ऑफ गिव्हिंग’!