आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॉकेटमनीतील रक्कम भूकंपग्रस्तांना दान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीत ३० ऑक्टोबर रोजी नॉर्सिया येथे भूकंप झाला. या घटनेत शहरातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. पीडितांना स्थानिक नागरिक वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहेत. येथील १० वर्षांच्या लॉरा या मुलीने तिचा पॉकेटमनी बचावकार्यासाठी दिला तसेच नोर्सिया शहराच्या मेअरला याबाबत पत्र लिहिले की, मी या घटनास्थळाच्या बातम्या दररोज टीव्हीवर पाहते. माझे आई-वडील काही वर्षांपूर्वी नोर्सिया येथे गेले होते, तेव्हाचे छायाचित्र मी पाहिले आहे. त्यामुळे आज त्या शहराची स्थिती पाहून खूप वाईट वाटते. माझ्याकडून ही छोटीशी मदत पाठवत आहे. शहर समितीने हे पत्र फेसबुकवर शेअर केले आहे.
लॉरा वायव्य इटलीतील जेनोआ शहरात राहते. तिच्या या मदतीची चर्चा संपूर्ण इटलीत होत आहे. नेटवरील सक्रिय लोक लॉराचे कौतुक करत आहेत. तिचे पत्र मोठ्या प्रमाणावर लाइक आणि शेअर केले जात आहे.
एका वापरकर्त्याने लिहिले की, लॉराचे ५ युरो हे ५० लाख युरोप्रमाणे मौल्यवान आहेत. तिची मदतीची इच्छा पाहूनच डोळ्यात अश्रू उभे राहिले.
बातम्या आणखी आहेत...