आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताच्यूत करण्याचे प्रयत्न पथ्यावर ; तुर्की अध्यक्ष मजबूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅरेड मेलसिन
जेव्हा १५ जुलैच्या रात्री तुर्की लष्कराच्या एका जहाल गटाने देशाची सत्ता घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगन भूमध्यसागराच्या किनारपट्टीवर असलेल्या मरमारिस शहरात सुट्यांचा आानंद घेत होते. सत्तापालटाची चाहूल लागताच लष्कराचे कमांडो पोहोचण्याच्या अगोदरच ते हॉटेलातून पळाले. कमांडोंनी त्यांची कदाचित हत्याही केली असती. राजधानी अंकारा येथे लढाऊ विमाने संसदेवर बाँबफेक करत होते,त्यामुळे ते तेथे गेले नाहीत. जिथून त्योची राजकीयस कारिकर्द सुरू झाली त्या इस्तंबूल शहरात ते गेले. तेथे शहरातील गलिच्छ वस्त्यांमधील पाणीपुरवठा करणारे महापैार म्हणून त्यांची ओळख आहे.

विघातक शक्तींनी टीव्ही स्टेशन्सवर ताबा मिळविला होता.म्हणून एर्दोगेन यांनी फेसआईम अॅपवर एका तुर्की बातमी देणाऱ्याशी संपर्क साधला. त्या न्यूजबँकरने तो फोन सरळ कॅमेऱ्यासमार ठेवला आणि अध्यक्षांनी देशातील जनतेला आपल्या समथर्कांना रस्त्यांवर येण्याचे आवाहन केले. बंड करणारे सैनिक सकाळपर्यंत पळापळ करत होते. त्या दिवशी विजेते एर्दोगन हेे इस्तंंबूलमध्ये गर्दीसमाेर उपस्थित झाले. विद्राेह करणाऱ्यांना फाशी द्या, अशा घोषणा लोकांनी त्यावेळी दिल्या. मृत्यूच्या छायेत वारणारे हे अध्यक्ष आता आधिक ताकदवान झाले होते.

जगात एकाधिकारशाहीबरोबरच एर्दोगन हे अधिक बलवान होण्याचे संकेत देतात. त्यांच्या हुकूमशाही वृत्तीची झलक अनेक वर्षापासून दिसत आहे. सत्तापालटाच्या प्रयत्नानंतर ३६ हजार लोकांना अटक करण्यात आली. २०१४ साली तयार करण्यात आलेला अध्यक्षांचा प्रासाद हा ऑटोमन साम्राज्याची आठवण करून देतो. या महालात अध्यक्षांच्या भोजनात विष आहे का हे तपासण्यासाठी एक प्रयाेगशाळा असून अन्य हजार खेाल्या आहेत.

जेथे उच्च आणि अभिजन वर्ग धर्मनिरपेक्ष आहे, अशा देशात एर्दोगन हे धार्मिक मानले जातात. पहिल्या महायुद्धानंतर ओटोमन साम्राज्याचे पतन झाल्यानंतर कमाल अतातुर्क याने तुर्कीमध्ये लोकतंत्र आणि धर्मनिरपेक्षता यांचा पाया घातला होता. तुर्की इतका धर्मनिरपेक्ष आहे की, २०१३ पर्यत सरकारी महिला कर्मचारी डोक्याला स्कार्फ गुंडाळू शकत नव्हती. २००२ मध्ये सत्तेत आल्यानंतर एर्दोगन यांनी आंतरराष्अ्रीय पातळीवर संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षपासून त्योच सरकार विरोधक आणि पत्रकारंाना तुरूंगात पाठवत आहे. त्यांचा एकेपी पक्ष मध्यममार्गी इस्लाम मानतो. पण त्यांना जाणणारे लोक म्हणतात की त्यांना वैयक्तिक संपर्क जास्त हवा असतो. त्यांचे हे राजकीय कौशल्यच त्यांना व्यक्तीपूजेच्या दिशेने नेत आहे.
बातम्या आणखी आहेत...