आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तम पर्याय... अपघात टाळण्यासाठी ‘ड्रायव्हर मोड’ची सुविधा हवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. याचे प्रमुख कारण स्मार्ट फोन असल्याचे उघड झाले आहे. ही बाब गांभीर्याने घेत येथील नियामकांनी स्मार्ट फोन बनवणाऱ्या कंपन्यांना एअरप्लेन मोडप्रमाणेच स्मार्ट फोनमध्ये ड्रायव्हर मोडची सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना लोक मोबाइल वापरू शकणार नाहीत. ड्रायव्हर मोडवर अॅप तसेच मेसेज ब्लॉक होतील तसेच त्यावर दिशादर्शक तसेच गाणी ऐकण्याची सुविधा असेल.
ड्रायव्हर मोड आवश्यक असल्याचे मुख्य कारण म्हणजे सध्या लोक वाहन चालवताना पोकेमॉनसारखे गेम्स खेळतात, न्यूज, व्हिडिओ पाहतात, सोशल मीडियावरील पोस्टला उत्तर देतात, त्यावर चर्चा करतात. यामुळे वाहनावरील नियंत्रण जाते व अपघात होतात. नियामकांनी दिलेल्या निर्देशांनुसार, ड्रायव्हर मोडमध्ये फोनची वायरलेस कनेक्टिव्हिटी संपुष्टात येईल. नेव्हिगेशन वगळता अन्य अॅपकरिता टचस्क्रीन काम करणार नाही. हा नवा प्रस्ताव म्हणजे अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भाग आहे.
-गेल्या वर्षी अमेरिकेतील रस्ते अपघातांतील मृतांचा आकडा ७.२ टक्क्यांनी वाढला. मागील ५० वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे.
-२०१६ मध्ये अपघाती मृत्यूंचा दर १०.४ पर्यंत पोहोचला होता. त्यानुसार एकूण बळींची संख्या १७,७७५ एवढी आहे.
}appleinsider.com
बातम्या आणखी आहेत...