आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन अध्यक्षांवर टीव्ही शोमध्ये तिखट प्रहार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एनबीसी टेलिव्हिजनच्या सॅटर्डे नाइट लाइव्ह  (एसएनएल) शोमध्ये अमेरिकन अध्यक्षांची धोरणे आणि निर्णयांवर तिखट मते नोंदवण्यात आली.  या शोमध्ये अगोदरच जॉर्ज बुश आणि बराक ओबामा यांच्यावर कडक टीका झालेली आहे. आता पाळी आहे डोनाल्ड ट्रम्प यांची.  या शोमध्ये ट्रम्प यांच्या वादग्रस्त निर्वासित धोरणांची जोरदार खिल्ली उडवण्यात आली.
 
या शोचा हा ४२ वा भाग चालू आहे आणि याचे स्वरूप फार जुने आहे. तरीही यातील ट्रम्प यांच्यावर केली जाणारी टीका प्रभावित करते. या शोमधील राष्ट्राध्यक्ष  (एलेक बाॅल्डविन) एका विनोदी पात्राच्या रूपात लोकअदालतीमध्ये निर्वासितांबाबत आपल्या कार्यकारी आदेशाबाबतचा एक खटला लढवतात. वकील कॅलीएन कॉनवे (केट मेकिन्नॉन) एका वेड्या राक्षसासमान बातम्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रेस सचिव सीन स्पाइसर (मेलिसा मेकार्थी) यांना अत्यंत अकार्यक्षम दाखवले गेले आहे. ही एक करमणूक एक मनोरंजक कॉमेडी आहे. 
 
 
एसएनएलचा ११ फेब्रुवारी रोजी जो एपिसोड झाला,तो एपिसोड गेल्या सहा वर्षांत सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या शोपैकी एक होता.   १८ ते ४९ वयोगटातील प्रेक्षकांनी हा शो जास्त संख्येने पाहिला.  ही कॉमेडी केवळ विषयानुरूप अशी नाही तर सादरीकरणाच्या बाबतीतही आपल्या वेळेच्या हिशेबानुसार चालते.
 
बराक ओबामा  यांच्या काळात जिमी फेलोन यांना लेट नाइट शोमध्ये  लोकप्रियता मिळाली. यात नाटय कमी होते. जॉर्ज बुश यांच्या शासनकालात डेली शोमध्ये जॉन स्टीवर्ट युद्धासंदर्भात प्रशासनाच्या कमजोर बाबींवर टीका करण्यात येत होती.  सॅटर्डे नाइट लाइव्ह शो गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. त्यांच्या ताज्या भागात ट्रम्प यांना एका कार्टून प्रमाणे दाखविण्यात आलेले अाहे. यातून असे संकेत मिळतात की, लोकप्रिय होण्यासाठी शो, काय करू शकतो. दरम्यान या शोचे प्रस्तुतीकरण मर्मभेदी आहे.  
बातम्या आणखी आहेत...