आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉर्डनच्या ३०० अपयशांत दडलेय एका महान बास्केटबॉलपटूच्या यशाचे गमक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायकेल जॉर्डन हा सर्वकालीन सर्वोत्तम  बास्केटबॉल  खेळाडू. आपल्या अनेक अपयशांनाच तो यशाचे कारण मानतो. कारण अपयशांनीच त्याला यशासाठी  आधिक मेहनत करण्यास प्रवृत्त केले. अपयशाने त्याला निराश नाही केले. खरे पाहता, मायकेल जॉर्डनने आपल्या अपयशाचा हिशेबच ठेवला होता. तो ३०० वेळा गेम हरला आणि २६ वेळा विजयाच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाऊन अपयश आले. पण यामुळे खचून न जाता मायकेल जॉर्डन याच अपयशाला आपली यशाची रेसिपी मानतो. जॉर्डन म्हणताे की, भीती ही अनेक लोकांना बाधा वाटते. पण माझ्यासाठी हा एक भ्रम आहे. अपयशाने मला नेहमीच पुढच्या टप्प्यावर अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रेरित केले आहे. 

शालेय दिवसापासूनच मायकलला बास्केटबॉल आवडत होते. मायकल हा परिवारातील पाच भावंडांपैकी एक. यासाठी स्पर्धेचे बाळकडू त्याला कुटुंबातूनच मिळाले होते. मोठा भाऊ लॅरीसमवेत त्याची स्पर्धा होती. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या अंगणात ते आपसात मॅच खेळायचे. साधारणपणे लॅरी प्रत्येक मॅचमध्ये आपला छोटा भाऊ मायकल याला  हरवायचे. कुटुंबातच लॅरीला चांगला अॅथलेट म्हणून ओळख मिळाली होती. शाळेतील प्रशिक्षकही लॅरीलाच चांगला खेळाडू मानत होते. लॅरीचा छोटा भाऊ म्हणूनच मायकेलला ओळख होती. पण मायकेलला हरणे पसंत नव्हते. मग भले त्यांचा भाऊ असो किंवा अन्य कोणी. पण भावाभावातील स्पर्धेचा त्यांना फायदाच झाला. लॅरी हायस्कूलमध्ये असतानाच त्यांच्या कोचने मायकलला समर कॅम्पमध्ये बास्केटबॉल खेळायला बालावले होते.पण मायकेल शाळेतच आला नव्हता. दोन्ही भाऊ आणि  एक मित्र हे विद्यापीठाच्या चमूत निवड व्हावी म्हणून प्रयत्नशील होते. शिबिरात उपस्थित प्रत्येकाला मायकेलचा वेग आणि कौशल्य यावर विश्वास होता. पण प्रशिक्षकाला वाटायचे की, मायकेलची उंची कमी आहे. यासाठी त्याला विद्यापीठाच्या कनिष्ठ संघात खेळले पाहिजे.  

संघाची घोषणा झाली, तेव्हा मायकेलचे नाव यादीत नव्हते. यावर मायकेलचा विश्वासच बसेना. अल्फाबेटिकल क्रमाने बनवण्यात आलेल्या यादीत जे पासून सुरू होणारी नावे त्याने चार चार वेळा पडताळून पाहिली. आपले नाव यादीत नाही यावर त्याचा विश्वासच बसेना. तो अत्यंत दु:खी मनाने घरी आला. घरी आल्यानंतर खूप रडला. पण आईने त्यांचे सांत्वन केले. तिने मायकेलला चांगला सल्ला दिला की, तू आता तुझ्या प्रशिक्षकासमोर हे सिद्ध कर की, तुम्ही चूक केली आहे. यानंतर मात्र मी निराशेतून बोहर पडल्याचे व खेळ सुधारण्यास सुरू केल्याचे मायकेल सांगतो. जराशा अनिच्छेनेच मायकेल ज्युनिअर टीममध्ये खेळण्यास तयार झाला. यानंतर त्यांच्या खेळात बदल झाल्याचे पहिल्यांदाच त्यांच्या इन्स्ट्रक्टरला जाणवले. ते नेहमी सकाळी ७ ते साडेसातच्या वेळेस शाळेेत पोहोचायचा. पण जेव्हा जायचे तेव्हा मायकेलच प्रथम पोहाचल्याचे त्यांना दिसून यायचे. बास्केटबॉल कोर्टातून नेहमीच बॉलचा अावाज यायचा मग कोणताही ऋतू असो. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा  शेवटी इन्स्ट्रक्टरलाच सांगावे लागायचे की, आता बस कर आणि कोर्ट सोड. 

त्याची उंची १८३ सेमीपेक्षा कमी होती म्हणून त्यांना वरिष्ठ संघात प्रवेश मिळाला नाही. तरीही त्यांनी कनिष्ठ संघात इतका चांगला खेळ दाखवला की, तो संघाचा सर्वात लाेकप्रिय खेळाडू बनला. त्यांचा वेग आणि कौशल्य टीममधील इतर काेणापेक्षाही चांगलेच होते.एका गेममध्ये २५ ते ४० पॉइंट कसे मिळवले जातात हे जाणून घेण्यासाठी वरिष्ठ संघातील खेळाडू मायकलचा खेळ पाहायला यायचे, हा त्याच्या खेळाचा दर्जा होता.

हायस्कूलच्या पहिल्या वर्षात त्याची उंची अंदाजे १० सेंटिमीटरने वाढली. लांब हातामुळे त्यांना बॉल फेकणे आणि पकडणे सोपे जात होते.  त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे कोचनाही अशक्य झाले. त्यांना पुन्हा युनिव्हर्सिटीच्या टीममध्ये भरती केले गेले. अपयशाचा स्वीकार करा आणि त्याचाही फायदा उठवा, ही मायकेलची नेहमीच खसियत राहिली आहे. एकदा त्याने सांगितले की, मी जेव्हा जिंकताे तेव्हा फार थकलेला असतो आणि असा विचार करतो की, हे सर्व सोडून द्यावे. पण जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा माझे नाव नसलेली विद्यापीठाची यादी माझ्या डोळ्यासमोर येते. यानंतर संघर्ष करण्याची इच्छा पुन्हा जागृत होते. आज मायकेलचे नाव बास्केटबॉलच्या क्षेत्रात सर्वात यशस्वी खेळाडूच्या रूपात घेतले जाते. त्याने आपल्या करिअरमध्ये ६ वेळा एनबीए चॅम्पियनशिप, ५ वेळा  एमपीव्ही ट्रॉफी, १२ वेळा  ऑल स्टार गेम्स आणि दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकले.
 
९००० शॉट्स चुकले संपूर्ण करिअरमध्ये
मायकेल जॉर्डन यांनी एकदा सांगितले की, मी करिअरमध्ये ९००० शॉट्स चुकलो. ३०० वेळा हरलो. २६ वेळा इतरांची अपेक्षा असूनही विजय हातातून निसटला. 
 
१.३१ अब्ज डॉलर  संपत्ती कमावली 
फोर्ब्स अनुसार सर्वकालिक या महान खेळाडूला १५ वर्षांच्या एनबीए बास्केटबॉल करिअरमध्ये देान वेळा सर्वापेक्षा जास्त पैसे मिळाले. खेळातून ९० मिलियन  डॉलर वेतन मिळाले.  
 
९० टक्के शेअर्स शार्लेट हाॅनेट्समध्ये 
२०१० मध्ये त्यांनी या टीमचे ९० टक्के शेअर्स घेतले. तेव्हा टीमचे मूल्य १७५ मिलियन डाॅलर होते. आज त्याचे मूल्य ७८० मिलियन डॉलर आहे. सात रेस्तराँ आणि एक कार डीलरशिप नावावर आहे. 
बातम्या आणखी आहेत...