आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंपनीतील लोकांच्या ब्रँडिंगचे महत्त्व ओळखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानामुळे बहुतांश उत्पादने आणि सेवा ग्राहकांपर्यंत येऊन ठेपल्या आहेत. कंपनीत काम करणा-या लोकांना याचे श्रेय जाते. व्यवसाय वाढल्याने कंपनीत काम करणा-यांची जबाबदारी, पद आणि अनुभव वाढतो. पुढे जाण्यासाठी कंपनी व कर्मचा-यांचे ब्रँडिंग आवश्यक असते. विशेषत: मोठ्या जबाबदा-या सांभाळणा-या लोकांची ब्रँडिंग गरजेचे आहे. कारण परिवर्तनासाठी या लोकांचे मोठे योगदान असते. ते पर्सनल ब्रँडिंग करू शकतात. एका उदाहरणाने हे समजून घेऊ. खंडेलवाल अँड कंपनी ही एक अकाउंटिंग फर्म आहे. फर्ममध्ये काम करणारे सीए पर्सनल ब्रँडिंग करण्यासाठी विशेष पद्धती वापरत आहेत. त्यात-

इंटरनेट लायब्ररीचा उपयोग
हे सीए इंटरनेटवरील कंटेंट दररोज बदलण्याऐवजी स्वत:ची माहिती, फोटो, स्वत:च्या कल्पना मांडण्यासाठी इंटरनेटवरील लायब्ररीचा उपयोग करतात. यात ओरिजनल रायटिंगची गरज नसते. टारगेट ऑडियंस दीर्घकाळ त्यांना लक्षात ठेवतात.

पोर्टफोलिओ इमेजमध्ये इन्फोग्राफिकचा उपयोग :
ग्राफिक डिझायनर, आर्किटेक्ट आणि आर्टिस्ट लोक पोर्टफोलिओ इमेजमध्ये आपल्या कामाचे सादरीकरण करत असतात. अशाच प्रकारे ध्येयवादी व्यावसायिक सीए पोर्टफोलिओमधील इमेजमध्ये इन्फोग्राफिकचा वापर करत आहेत. इन्फोग्राफिकवरून तुम्ही ऑफिसमध्ये काम करता आणि त्यासाठी तुमचे किती योगदान आहे, हे दिसून येते.

अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने नेटवर्किंग :
सीए स्मार्टफोन युजर बेसचा खूप फायदा घेत असतात. अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने ते उत्पादन आणि सेवा स्मार्टफोनवर उपलब्ध करून देतात. अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने पर्सनल ब्रँडिंग होत आहे. जसे की, नेटवर्क बनवण्यासाठी लंचमीट अ‍ॅपचा फायदा घेऊ शकता. त्यामुळे लोक कुठे राहतात, हेदेखील कळते. दुसरे- स्क्राइबच्या मदतीने तुम्ही तुमची माहिती, विचार आणि कल्पना फोकस ग्रुपसोबत शेअर करू शकता. यामुळे नेटवर्क तयार करणे सोपे जाते.

कर्मचारी हा कंपनीचा खरा चेहरा :
येथे पर्सनल ब्रँडिंगला टॅलेंट आणि लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामशी जोडले गेले आहे. उच्च पदावरील लोकांना आपल्या कर्मचा-यांकडून जास्त नव्हे तर सर्वोत्कृष्ट कामाची अपेक्षा असते. कर्मचारी हाच कंपनीचा चेहरा आहे, हे त्यांना चांगले माहीत असते.