आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील धोका युद्ध नव्हे; महामारी, तुटपुंज्या अर्थतरतुदीमुळे बचाव कठीण असल्याचे शास्त्रज्ञांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमध्ये जो विषाणू पुढील महामारी पसरवू शकतो तो आधीच सक्रिय आहे. तो एच ७ एन ९ नामक बर्ड फ्ल्यू आहे. काही काळापासून कोंबड्यांबरोबर मानवी शरीरातही तो हातपाय पसरवत आहे. ही वाईट बातमी आहे. कारण हा विषाणू प्राणघातक आहे. आता नुकतेच या विषाणूमुळे प्रभावित ८८ टक्के लोकांना न्यूमोनिया झाला होता. यातील तीन चतुर्थांश लोकांना अतिदक्षता विभागात भरती करावे लागले. ४१ टक्के लोकांचा मृत्यू झाला.
 
एच ७, एच ९ अातापर्यंत माणसातून माणसात सहजपणे पसरू शकला नाही.  मात्र जाणकार जाणतात की, हा विषाणू जेवढ्या जास्त काळ मानवी शरीरात राहील तितका अधिक संसर्गजन्य असेल. पश्चिम आफ्रिकेत इबोला, दक्षिण अमेरिकेत जिका तर मध्य पूर्वेतील एमइआरएस सारखे धोकादायक आजार जगभर हातपाय पसरू लागले आहेत. गेल्या ६० वर्षात प्रत्येक दशकात नव्या आजारांची संख्या चार टक्क्यांनी वाढली आहे. १९८० नंतर दरवर्षी पसरणाऱ्या आजारांची संख्या ३ टक्क्यांनी वाढली आहे. मिनेसोटा युनिव्हर्सिटीतील संसर्गजन्य आजार रिसर्च आणि पॉलिसी सेंटरचे संचालक आणि डेडलिएस्ट एनिमी : अवर वॉर अगेंस्ट किलर जर्म्स या पुस्तकाचे लेखक मायकल ओस्टर होल्म सांगतात की, प्रचंड धोकादायक एच ७, एच ९ चा सामना सध्या आपण करत आहोत. बर्ड फ्ल्यू गंभीर आहेच. पण याचा संसर्ग होईल तेव्हा खूप उशीर झालेला असेल.
 
खूप उशीर यासाठी की, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. मार्गरेट चानसह अनेक वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, महामारींशी लढायला आपण पूर्णपणे सक्षम नाही. खरे तर संसर्गजन्य आजारांशी लढण्याची सिस्टिमच पूर्णपणे कोलमडून गेली आहे. इतकी की, बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंंडा यांना संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी सार्वजनिक आणि व्यक्तिगत प्रयत्नांतर्गत (सीइपीआई) पुढील पाच वर्षांसाठी ६४० कोटी रुपये देण्याची घोषणा करावी लागली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यापासून आरोग्य विभागात अनेक जागा रिक्त आहेत. आरोग्य आणि मानवी सेवा विभागातील बजेटमध्ये ९७० अब्ज रुपयांची कपात करण्यात आली आहे.
 
आजार पसरण्यात जलवायू परिवर्तनाचीही भूमिका आहे. वाढत्या तापमानामुळे जिका पसरवणाऱ्या एडिस इजिप्ती डासांसारख्या किटक आणि प्राण्यांची व्याप्ती वाढवली आहे. त्याशिवाय जेनेटिक इंजिनिअरिंग साधनांमुळे अतिरेकी वा कोणत्याही समूहाला घातक विषाणू पसरवणे सोपे करून टाकले आहे. जाणकारांचे म्हणणे आहे की, एखादा नवा आजार उद््भवल्यास आपल्याकडे बचावासाठी औषधच नसेल, अशी परिस्थिती उदभवू शकते. २०१४ मध्ये इबोलाची साथ आल्यानंतर ११००० लोकांचा मृत्यू झाला. हा विषाणू वैज्ञानिकांसाठी काही गूढ नव्हते. याचा शोध १९७६ मध्येच लागला होता. तरीही त्याचे बचावाचे औषध वा लस तयार होऊ शकली नाही.
 
 दिलासा देणारी गोष्ट एकच ती म्हणजे, आजारांचा धोका वैज्ञानांच्या पटकन लक्षात येत आहे. नव्या वा रहस्यमय विषाणूच्या शोधासाठी पुढील पिढीच्या जेनेटिक सीक्वेंसिंग साधनांचा उपयोग केला जात आहे. मानवासमान सूक्ष्म किटकही चार कोटी पट वेगाने विकसित होतात. हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ.आशिष झा सांगतात की, पुढील दहा वर्षात लाखो लोकांना अल्प काळात मारणारी एखादी गोष्ट म्हणजे कोणतातरी संसर्गजन्य आजारच.
वैज्ञानिक ज्या संसर्गजन्य आजाराबद्दल जाणतात ते सारेच प्राण्यांपासून पसरतात.
 
एचआयव्हीची सुरुवात माकड, सार्सची सुरुवात चिनी पक्षी आणि इन्फ्लूएंझाची पाण्यातील पक्ष्यांपासून झाली. प्राण्यांपासून हे आजार माणसांना होतात. त्यांना रोखणे शक्य आहे का? या विषाणूंना ओळखण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रेडिक्ट २००९ हाती घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विकासासाठी अमेरिका एजन्सीच्या (यूएसएड) सहाय्याने चालणाऱ्या प्रेडिक्टने प्राणी व मानवातील १००० विषाणू शोधून काढले आहेत. एक अन्य कार्यक्रम ग्लोबल वाइरोम प्रोजेक्टअंतर्गत मानवात पसरण्याची क्षमता असलेले पाच लाख विषाणू शोधण्याचे काम सुरू आहे. या कार्यक्रमाशी निगडित वैज्ञानिकांचा अंदाज आहे की, यासाठी २०० अब्ज रुपयांहून अधिक खर्च लागेल. खरा प्रश्न आहे तो आर्थिक तरतुदीचा.
 
खर्चिक शोधात औषध कंपन्यांना रस नाही
धोकादायक विषाणू शोधण्यात बरीच प्रगती होऊन जग आणि अमेरिका मोठ्या संसर्गजन्य आजाराविरुद्ध लढण्यासाठी सक्षम नाही. २० व्या शतकाचा मध्यकाळ लस शोधण्यासाठी सुवर्णकाळ होता. डॉ. जोनस साल्कसारख्या वैज्ञानिकांनी पोलिओसारख्या दुर्धर आजारांवर लस शोधून काढली. जगभर औषध बाजाराची उलाढाल ६० खर्व रुपयांहून जास्त आहे. मात्र, यात लसींची भागीदारी केवळ ३ टक्के इतकी आहे. कोणत्याही एका विषाणूचा खात्मा करण्यासाठी एक लस बनवण्यासाठी ६० खर्व रुपयांहून जास्त खर्च येतो. यासाठी अनेक वर्षे परीक्षण करावे लागते. त्यामुळे औषध कंपन्या लस निर्माण करण्याच्या उद्योगापासून मागे हटत आहेत. बिल-मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या ग्लोबल हेल्थ डिव्हिजनचे अध्यक्ष डॉ.ट्रेवर मुंडेल सांगतात की, ‘महामारीवर लस बनवण्यासाठी कंपन्यांना कोणीही प्रोत्साहन देत नाही.’। त्यामुळे गेट्स फाउंडेशन, ब्रिटनच्या वेलकम ट्रस्टसह अनेक सरकारांनी या वर्षी सीईपीआयची सुरुवात केली आहे.
 
अब्जावधींचे नुकसान
महामारीचे गंभीर आर्थिक परिणाम भोगावे लागतात. २००३ मध्ये सार्सच्या प्रकोपाने ८०० लोकांचा मृत्यू झाला. ग्लोबल अर्थव्यवस्थेवर व्यापार, परिवहन तसेच उपचारासाठी ३४०० अब्जांंहून जास्त रकमेचा भार पडला. जागतिक बँकेचा अंदाज आहे की, फ्ल्यूची महामारी पसरल्यास २५० खर्वहून जास्त रुपयांचे नुकसान होऊ शकते.
 
संसर्गजन्य रोग पसरण्याची कारणे काय आहेत?
वैज्ञानिक प्रगतीनंतरही  आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा मार्ग मानवानेच प्रशस्त करून टाकला आहे. 
- शहरीकरण: एकेकाळी बंदरे असलेली शहरे प्लेगच्या विळख्यात सापडली होती. आज जिकासारख्या विषाणूने अस्वच्छ वस्त्यांत हातपाय पसरले आहेत.
-  युद्ध: सीरियात युद्धामुळे रुग्णालयांवर जास्त भार पडला.  अनेक रुग्णालयेच नष्ट झाली. लोकसंख्या दुभंगली गेली. त्यामुळे क्षयरोग आणि पोलिओला आमंत्रणच मिळाले.
- सुस्त कारवाई : इबोला माहीत असलेला विषाणू आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या संथ कारवाईमुळे त्याने २०१४ मध्ये उग्र रूप धारण करून प्राण घेतले.
- नैसर्गिक संकटे : भूकंपासारख्या आपत्तीनंतर कॉलरासारखे आजार झपाट्याने पसरतात.
- हवाई प्रवास : देशाची सीमा पार करण्यासाठी विमान सर्वात चांगले साधन.  २००९ एच१, एन १ विषाणू एक महिन्यात ४८ देशांत पसरला होता.
 
गेट्स यांचा इशारा
२०१५ मध्ये एका भाषणात बिल गेट्स म्हणले होते, मी लहान होतो तेव्हा अणुयुद्धाबाबात सर्वाधिक चिंतित असायचो. पुढील काही देशात सर्वाधिक लोक मरतील ते युद्धामुळे नव्हे तर एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे. लोक क्षेपणास्त्रांनी नव्हे तर सुक्ष्म किटाणुंमळे आपल्या प्राणांना मुकतील. त्यांचे वाक्य आता खरे ठरत आहे. 
बातम्या आणखी आहेत...