आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 पौंडांच्या नोटेची किंमत ४२ लाख रुपये, लिलावाऐवजी दान केली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनच्या उत्तर आयर्लंडमधील एका महिलेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तिला काही दिवसांपूर्वी एनिसकिलन शहरात पाच पौंडांची दुर्मिळ नोट मिळाली होती. ब्रिटनमध्ये या प्रकारच्या चारच नोटा छापण्यात आल्या होत्या. या नोटेवर सोन्याच्या तारांची अत्यंत सुंदर डिझाइन असून त्यावर १८ व्या शतकातील साहित्यिक जेनी ऑस्टन यांचे वर्णन आहे. तसेच नोटेवरील बँक ऑफ इंग्लंड या शीर्षकाखाली ब्रिटिश संसदेचे चित्र आहे.
  
या नोटेचे सध्याचे बाजारमूल्य ४२.५ लाख रुपये एवढे आहे. ती म्हणते, मला माहिती आहे. मी त्या नोटेचा लिलाव केला असता तर कित्येक पट किंमत मिळाली असती; पण या नोटेचा वापर तरुणांच्या कल्याणासाठी करण्याची माझी इच्छा आहे.    
 
- डिसेंबर २०१६ मध्ये या श्रेणीची पहिली नोट साऊथ वेल्समधील एका कॅफेत, दुसरी क्रिसमस कार्डमध्ये सापडली. तिसरी रेस्टॉरंटमध्ये तर चौथी नोट आता सापडली आहे.
बातम्या आणखी आहेत...