आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Price Of Onions Could Become A Political Game Changer

कांद्यावरून रंगलेले \'राजकीय महाभारत\';अन्नदाता असुरक्षित तर ग्राहकांत संभ्रमावस्था!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कांदा-भाकरी' हा ग्रामीण भारतातील गरीब जनतेचा आहार. परंतु आता हाच 'कांदा' आता गरीबाच्या भाकरीला पारखा झाला आहे. कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. 10 ते 15 रुपये प्रति किलो किरकोळ दराने मिळणारा कांदा आज 40 ते 60 रुपये किलो दराने खरेदी करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तर या कांद्याने शंभरीही गाठली होती. ऐन सणासुदीच्या दिवसांपेक्षा निवडणुका जवळ आल्यानंतरच कांद्याचे दर का वाढतात? असा प्रश्न देशातील जनतेला पडला असेल तर याचे नवल वाटू नये.

गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या दरवाढीवरून गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'राजकीय महाभारत' सुरु झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांच्या या जीवघेण्या खेळामुळे 'कांदा पीक' खूपच संवेदनशील बनले आहे. राजकीय कारणास्तव कांद्याला वेठीस धरले जात असून कांदा उत्पादक शेतकर्‍यांना जेरीस आणले जात आहे. 'अन्नसुरक्षे'चा आग्रह धरणार्‍या या देशातच 'अन्नदाता' मात्र असुरक्षित झालेला दिसत आहे. परंतु कांद्यावरून रंगलेले 'राजकीय महाभारत' हे सत्ताधारी पक्षाला धोकादायक असल्याचेही नाकारता येत नाही. कारण कांद्याच्या वाढलेल्या दरानेच भारतीय जनता पक्षाचा 1999 मधील निवडणुकीत पराभव झाला आणि सत्ता कॉंग्रेस पक्षाला मिळाली.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'कांद्याने केला होता वांदा...गेलं होतं मुख्यमंत्रीपद!'