आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळीव कुत्रा हरवल्याचे दु:ख फेसबुकवर शेअर, जगभरातून सहानुभूती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुले किती भावूक असतात, याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. अमेरिकेतील ओहयो प्रांतात मॅट वेलेस यांची ५ वर्षांची मुलगी मेडिसन रडत होती. कारण तिच्या घरातील पाळीव कुत्रा ‘बडी’ हरवला होता. बडीचे छायाचित्र हातात घेऊन मेडिसन प्रत्येकाला तो सापडून देण्याची विनंती करू लागली. मेडिसनच्या आईने हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आणि माझ्या मुलांना बडीची खूप आठवण येत आहे, असे पोस्टमध्ये लिहिले. 
 
काही तासांतच हा व्हिडिओ अमेरिकेसह जगभरात प्रसिद्ध झाला. अनेक देशांतील नेट युजर्सनी या मुलीला समजावून सांगण्याचे प्रयत्न केले. कॅलिफोर्नियातील डेन गुस्तावसन यांनी लिहिले की, ‘देवा, या लहानग्या मुलीसाठी काही चमत्कार घडवून आण.’ रोजी ओर्टेगा यांनी लिहिले की, ‘संपूर्ण स्पेन तुझ्यासोबत आहे.’ सिडने, स्कॉटलँड, रोम, बर्लिन इत्यादी शहरांतूनही मेडिसनसाठी प्रतिक्रिया आल्या. २१ एप्रिल रोजी अपलोड झालेला हा व्हिडिओ १ कोटी १० लाख जणांनी पाहिला. एका न्यूज चॅनलचादेखील मॅट यांना फोन आला होता. बडी सापडल्याची माहिती न्यूज चॅनलला एका व्यक्तीने फोनवर दिली होती; पण मॅट यांनी ही माहिती घरी सांगितली नाही. चॅनलने सांगितलेल्या ठिकाणी ते गेले आणि तेथून बडीला घरी घेऊन आले. बडीला घरी आलेले पाहताच मेडिसन प्रचंड खुश झाली. तिच्या या आनंदी होण्याचा व्हिडिओदेखील आईने फेसबुक पेजवर अपलोड केला. आता मेडिसन खुश असल्याची पोस्टही केली. या पोस्टमध्ये जगभरातील नेट युजर्सनी मेडिसनसाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले. 
king5.com
बातम्या आणखी आहेत...