आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Secret Of ISIS Success Is Use Of High Tech Technology

डिजिटल लढा : आयएसच्या यशाचे रहस्य.., हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरिया, इराकच्या अनेक भागांवर ताबा मिळवणारी अतिरेकी संघटना आयएससोबत ऑनलाइन लढा देण्यासाठी पश्चिमी देश सज्ज झाले आहेत. युरोपात एक पोलिस गट बनवला जात आहे. जो आयएसच्या ऑनलाइन भर्तीवर लक्ष ठेवेल. २०१०नंतर आयएसने पश्चिम युरोपातून जवळपास पाच हजार मुलांना आकर्षित केले आहे. डिजिटल युद्धातील त्याच्या वर्तनावर नजर टाकूयात.

ट्विटर योद्धा
आयएस सोशल मीडियावर आपली उपस्थिती वाढविणे आणि हॅशटॅग अभियान चालवण्यासाठी ट्विटर योद्ध्यांचा वापर करतात. ४६ हजार ट्विटर अकाउंट आयएसशी जोडलेले आहेत.

व्हिडिओ आणि चित्रपट
आयएसचा अल हयात मीडिया सेंटर बिगर अरबी लोकांना लक्ष्य करत जर्मन, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेचे व्हिडिओ बनवतात. एक मिनिटाच्या मुजाट्वीट व्हिडिअाेपासून एक तासाचा चित्रपट ‘द फ्लेम्स ऑफ वार’ बनवला जात आहे.

सरळ संपर्क
भावी योध्यांशी संपर्क वाढवण्यासाठी जिहादी मेमेस आणि इमोजीचा उपयोग करतात. तेे किटेन्स आणि न्यूटेल्लाचे फोटो दाखवून जवळीक साधतात. किक, व्हाट्सअॅपसारखे मॅसेजिंग प्लेटफाॅर्मद्वारे सरळ संपर्क साधतात.

ऑनलाइन नियतकालिक
अल हयातने ऑनलाइन नियतकालिक ‘दाबिक’चे नऊ अंक प्रकाशित केले आहेत. यात आयएसच्या स्वयंघोषित खिलाफत साम्राज्याची आकर्षक माहिती दिली आहे. मुसलमानांवर आयएसची धार्मिक सत्ता रेखांकित करण्यासाठी प्राचीन इस्लामी ग्रंथांचे सामानही वापरले जाते.