आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Shoe Laundry Is India\'s First Footwear Care Service, Started In 2003 By Sandeep Gajakas. From The Time Of Its Inception,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या धडपड्या व्यक्तिने मित्रासोबत लावलेल्या पैजेतून साकारला अगळावेगळा उद्योग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्चशिक्षण घेऊनही वाढत्या स्पर्धेत मनाजोगती नोकरी मिळवणे फारच कठीण झाले आहे. परंतु आजच्या सुशि‍क्षित तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न धावता आपल्या हातोटीच्या जोरावर अचूक संधी हुडकली पाहिजे. काळाची पावलं कोणत्या दिशेने जात आहेत, हे ओळखून त्यादृष्टीने आपल्या उद्योग, व्यवसायाची रणनीती आखली पाहिजे. एवढेच नाही तर त्याला नवतंत्रज्ञानाचीही जोड दिल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. याचाच अवलंब करून एका होतकरू तरुणाने अगळावेगळा उद्योग थाटला आणि तो यशस्वीही करून दाखवला. या व्यक्तीचे नाव आहे संदीप गजासक. संदीप गजासक यांनी आशिया खंडातली पहिली 'शू लॉंड्री' उभारून देशातच नव्हेतर परदेशातही नावलौकीक मिळवला आहे.

आपला व्यवसाय 'जरा हटके'च असावा, असे नेहमीच संदीप गजासक यांना वाटत होते. कपड्यांची लॉंड्री तर आता ठिकठिकाणी झाल्या आहेत. आपण 'शू लॉंड्री' म्हणजे 'बुटांची लॉंड्री' सुरु करण्याची 'युनिक आडिया' गजासक यांना 2003 मध्ये प्रत्यक्षात अस्तित्त्वात आणली. मुंबईतील सायन येथे त्यांची पहिली 'शू लॉंड्री' थाटली. पाहता पाहता आता 'शू लॉंड्री'च्या अकरा शाखा सुरू आहेत. विशेष म्हणजे केनिया आणि भूतान सारख्या देशातही या धडपड्या व्यक्तिने आपल्या छोट्याशा व्यवसायाचा खुप कौशल्याने विस्तार केला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सुरत, इंदूर, बंगळुरु, चेन्नई, कोंम्बुत्तूर येथेही यशस्वीरित्या आपला उद्योग सुरु ठेवला आहे. भविष्यातही देशभरात तसेच ‍परदेशातही मोठ्या शहरात 'शू लॉंड्री'च्या शाखा सुरू करण्याचा मानस 'दिव्यमराठी ऑनलाईन'शी बोलताना व्यक्त केला.

पुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा, 'असं सुरू झालं करिअर...'