Home »Divya Marathi Special» The Worlds Best Poet

जगातील सर्वोत्कृष्ट काव्यरचना

दिव्य मराठी | Mar 21, 2017, 02:31 AM IST

  • जगातील सर्वोत्कृष्ट  काव्यरचना
आज जागतिक काव्य दिन. जगाला एकापेक्षा एक मौल्यवान, अजरामर काव्य कलाकृती प्रदान करणाऱ्या सर्व कवींना गौरवण्याचा हा दिवस. युनेस्कोने १९९९ मध्ये पॅरिस परिषदेत २१ मार्च या दिवसाची घोषणा केली. तेव्हापासून प्रत्येक वर्ष एका महान कवीला समर्पित केले जाते. यंदाचे वर्ष तब्लिसी (जॉर्जिया)येथील कवी निकोलस बाजातशविली (१८१७-१८४४) यांना समर्पित करण्यात आले आहे. त्यांनी ३२ पेक्षा अधिक काव्यरचना केल्या. त्यात बहुतांश प्रेमकविता होत्या. मानवी भावना प्रकट करणे तसेच अनुभवण्याची अद्वितीय क्षमता काव्यात असते. युनेस्कोच्या महासचिवांनी म्हटलेच आहे की, कविता हा एक झरोका असून याद्वारे मानवतेतील वैविध्य मनमोकळा श्वास घेऊ शकते.

जगन्मान्य २० महाकाव्ये
-द एपिक ऑफ गिल्गामेश (२००० ईसवीसनपूर्व)
-द इलियड (८०० इसवी पूर्व) - होमर
-द ओडेसी (८०० इसवी पूर्व)- होमर
-महाभारत (३५० इसवी पूर्व, (आजवरचे सर्वात मोठे महाकाव्य, १ लाखाहून अधिक संस्कृत श्लोक)
-वर्जिल - द एनाइड द एनाइड (१९ इस पूर्व)
-ओविड - मोटामोर्फोसेज (8 ईसवी)
-शाहनामा - फिरदौसी (११ वे शतक), फारसीतील महाकाव्य
-ब्योवल्फ (९-१० वे शतक), (इंग्रजीतील सर्वात मोठे महाकाव्य, ३१८२ ओळी)
-द निबेलुन्जेन्लियड (१३ वे शतक)
-द साँग ऑफ रोलँड (११-१२ वे शतक)
-द सागा ऑफ ग्रेटियर द स्ट्राँग, आइसलँडिक सागा (१३-१४ वे शतक)
-लुडोविको अरिओस्तो- ऑर्लेन्डो फ्यूरीओसो (१५३२)
-द डिव्हाइन कॉमेडी- दांते (१३०८-३१२१)
-लुई दी केमिओन्स- द लुसिएड्स (१५७२)
-द फेअरी क्वीन- एडमंड स्पेन्सर १५९०)
-पॅराडाइज लॉस्ट- जॉन मिल्टन (१६६७)

७ ऑगस्ट १९४० रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठातील दीक्षांत समारंभात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व ब्रिटिश जज सर मॉरिस गॉयर यांच्यासह गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे हे छायाचित्र.scoopwhoop.com
गीतांजली: गुरुदेवांनीच केला इंग्रजी अनुवाद
गीतांजली हा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या १५७ कावितांचा जगविख्यात संग्रह आहे. १४ ऑगस्ट १९१० रोजी बंगाली भाषेत प्रकाशित झाल्यानंतर हे महाकाव्य १९१२ मध्ये इंग्रजीत अनुवादित झाले. त्यानंतर विविध भाषांमध्ये तिचे प्रकाशन झाले. इंग्रजी अनुवादित गीतांजलीत १०३ कविता खुद्द गुरुदेवांनीच अनुवादीत केल्या आहेत.नोव्हेंबर १९१२ मध्ये भारतीय समाजाने लंडनमध्ये ही गीतांजली प्रकाशित केली. त्यापुढील वर्षीच १९१३ मध्ये गुरुदेवांना नोबेल पुरस्कराने गौरवण्यात आले. पाश्चिमात्य साहित्यिक-कवींनी गीतांजली ही जगातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक असल्याचे मान्य केले.
सर्वोत्कृष्ट रचना
-सोनेट १८- विल्यम शेक्सपियर (१५६४-१६१६)
-हॉली सोनेट 10- डेथ, बी नॉट प्राउड - जॉन डन (१५७२-१६३१)
-डॅफोडिल्स- विल्यम वर्ड्सवर्थ (१७७०-१८५०)
- अ सॅम ऑफ लाइफ- हेन्री वेड्सवर्थ लाँगफेलो (१८०७- १८८२)
-ऑन हिज ब्लाइंडनेस- जॉन मिल्टन
(१६०८-१६७४)
- द टायगर- विल्यम ब्लॅक (१७५७-१८२७)
-ओड ऑन अ ग्रेशियन अर्न- जॉन कीट्स (१७९५-१८२१)
-महाभारत
महर्षी वेदव्यासांनी संस्कृत भाषेत एक लाखाहून अधिक श्लोक असलेले (दोन लाख ओळी) महाकाव्य लिहिले. या महाकाव्यात प्राचीन भारताचा उल्लेख असून त्यातील युद्धाचे पुरावे पांडुलिपीतही आहेत. जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांनी या महाकाव्यावर संशोधन केले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातही महाभारतावर संशोधन पत्रिका सादर करण्यात आली आहे.
-रामायण
महर्षी वाल्मीकी यांनी रचलेला हा पवित्र ग्रंथदेखील एक संस्कृत महाकाव्य असून यात २४ हजार श्लोक आहेत. वाल्मीकी ऋषींनी संस्कृतमधील पहिल्या महाकाव्याची रचना केली. हीच रामायण म्हणून प्रसिद्ध झाली. यासाठी त्यांना आद्यकवीची उपाधीही दिली गेली. रामायणाचाही विविध विदेशी भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे.
- कालिदास
संस्कृत भाषेतील महान कवी कालिदास हे जागतिक कीर्तीचे साहित्यिक आहेत. फारसे शिक्षण नसतानाही शास्त्रशुद्ध संस्कृत आणि त्यातील नैपुण्याच्या आधारे त्यांनी महाकवीची उपाधि प्राप्त केली. विविध राजे-महाराजांनी त्यांना गौरवले आहे. अभिज्ञान शाकुन्तलम्, मेघदूत, विक्रमोर्वशी या त्यांच्या काही निवडक रचना.

Next Article

Recommended