आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : २०१५ मध्ये चर्चेत राहणार हे विषय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२०१५ च्या उदरात काय दडले आहे याची जाणीव कोणालाच नाही. मात्र, ज्यांच्या कार्यपद्धतीवर वर्षभरात लक्ष असेल त्यांची माहिती वाचकांना देण्याचा प्रयत्न दिव्य मराठीने केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल, हे उघड आहे. याशिवाय अन्य मान्यवरांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईल. ज्यांच्या शिक्षेसाठी जगभरातून दबाव वाढत आहे असे गुन्हेगार कोण आहेत? तसेच जगावर छाप सोडणार्‍या क्रीडा आणि संगीत क्षेत्राशी संबंधित दिग्गजांची माहिती आज जाणून घेऊया.

अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल?
मोदी सरकारमध्ये २०१४ चा अर्थसंकल्प सादर करण्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत.मात्र, या वेळीही हिच स्थिती राहील असे वाटते. जेटली यांनी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया केली आणि सहा आठवडे रुग्णालयात घालवले. आगामी अर्थसंकल्पाबाबत लोकांना त्यांच्याकडून खूप आशा आहेत. व्यापार्‍यांचा पक्ष समजल्या जाणार्‍या भाजपकडून व्यापार्‍यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, जेटली यांच्यासमोर अनेक अडथळे आहेत. अशात अर्थसंकल्प येण्यास १ महिना २५ दिवस शिल्लक आहेत.

संभाव्य प्रश्न
- करातून मिळणारा पैसा निम्माच मिळू शकला आहे. याचा अर्थ अपेक्षित महसूल निम्म्यावर आला, त्यामुळे योजना कशा पूर्ण होणार?
- जीएसटीच्या दीर्घ प्रक्रियेमुळे त्याची अंमलबजावणी कशी होईल, तसेच एवढ्या मोठ्या देशात तो लागू करण्यात अडचणी येतील. त्यासाठीचा फार्म्युला आहे काय, असेल तर तो कोणता?
- मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली खरी, मात्र भारतातील व्यवसायाशी संबंधित वर्ल्ड बँकेच्या अहवालात व्यवसायासाठी भारताला १३४ वे स्थान दिले आहे. या यादीत चीन आणि नेपाळपेक्षाही मागे आहोत. भारताचा समावेश जगातील ५० देशांमध्ये व्हावा अशी मोदींची इच्छा आहे.
- महागाई आकड्यात कमी झाली. सामान्य माणूसही त्रासला आहे. रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करत नाही, त्यावरून याचा अंदाज येतो.
कर्ज स्वस्त होईल काय?
यूपीए सरकारच्या काळात रघुराम राजन आरबीआयचे गव्हर्नर झाले. राजन यांचे सुब्बारावप्रमाणे अडवणुकीचे धोरण राहणार नाही, व्याजदर कमी करतील असे वाटले होते. बाजारपेठेत मोठी मागणी होऊनही व्याज कमी केले नाही. नव्या सरकारनेही त्यांच्याकडून ही अपेक्षा केली. मात्र, ते आधीच्या नाणेनिधी धोरणातही झुकले नाहीत.
- मोदींच्या मेक इन इंडिया घोषणेच्या तुलनेत ते आपलाच राग आळवत आहेत, मेक फॉर इंडिया. ते सरकारविरोधी नाहीत. त्यांना जे वाटते ते स्पष्ट बोलतात. जेटली यांनी मात्र हे विचार फेटाळले आहेत.
- राजन महागाईतही व्याजदर कपात करण्यासाठी काही नाहीत.त्यामुळे त्यांना किमान महागाईची जाणीव आहे,अशी लोकांमध्ये भावना आहे.

जन-धन यशस्वी होणार?
- हंसमुख अधिया- बँकिंग सचिव
हंसमुख अधिया मोदी यांच्यासोबत दहा वर्षांपासून काम करत आहेत. आयआयएमनंतर त्यांनी योगमध्ये पीएचडी केली. त्यांच्याकडे सध्या जन धन योजनेचा प्रमुख अजेंडा आहे. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत. यामध्ये माय नोट्स टू मायसेल्फ या पुस्तकाने अधिकार्‍यांत प्रसिद्धी मिळवली आहे. गुजरातमध्ये शिक्षणाच्या अनेक योजना यशस्वी केल्या आहेत, त्यामुळे जन धनच्या यशस्वितेबाबत उत्सुकता आहे. याअंतर्गत देशात प्रत्येक व्यक्तीने बँकेत खाते काढणे अपेक्षित आहे.
नवा प्रयोग करू शकतील?
- राजीव महर्षी- वित्त सचिव
राजस्थानमध्ये मुख्य सचिवपदी असताना त्यांनी महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या. अधिकार्‍यांमध्ये ते नवीन संकल्पनासाठी ओळखले जातात, त्यामुळे ते नवा प्रयोग करू शकतील ?

- शक्तिकांत दास -
महसूल सचिव
दास मोदी विरोधक मात्र आता जेटलींना अर्थसंकल्पासाठी इनपूट देतील. त्यांच्यावर ही जबाबदारी आहे. महसूल जमा करणे व टॅक्स टुरिझमसारखी विशेषणे कमी करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

पुढे वाचा...
अमेरिका निवडणुकीतील चेहरे या वर्षी पैसा गुंतवणार?
एक किलो लाकडातून बाइक चालेल ४० किमी
वय २५ वर्षे, दिवसाची कमाई तीन कोटी रुपये
सर्वाधिक लढती जिंकण्याचा विक्रम मोडेल काय?
एका तासात ४६.५ किमी सायकलिंग करेल काय?
दहशतवाद : यांचा खात्मा होईल काय?